शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
2
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
3
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
4
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
5
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
6
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
7
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
8
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
9
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
10
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
11
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
12
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
13
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
14
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरला सुवर्णमंदिराची कलाकृती

By admin | Updated: September 4, 2014 22:00 IST

सिन्नरला सुवर्णमंदिराची कलाकृती

सिन्नर : इमारतींना रंग देऊन संसाराचा गाडा चालवितानाच विविध प्रकारच्या सूक्ष्म कलाकृती साकारण्याचा छंद जडलेल्या येथील संजय क्षत्रिय या कलाकाराने सुमारे साडेतीन लाख सोनेरी रंगाच्या मण्यांपासून अमृतसर येथील ‘सुवर्णमंदिरा’ची कलाकृती साकारली आहे. क्षत्रिय यांच्या हाताने साकारलेली सुवर्णमंदिराची प्रतिकृती पाहिल्यानंतर डोळे दिपून गेले नाही तरच नवल!प्लायवूड, थर्माकोल व त्यावर फेव्हीकोलने सोनेरी मणी चिटकवून बनविलेली सुवर्णमंदिराची प्रतिकृती मनमोहक तेवढीच प्रेरणा म्हणावी लागेल. क्षत्रिय कुटुंबीय गेल्या तीन महिन्यांपासून डोळ्यात तेल घालून व मानपाठ एक करून सदर कलाकृती बनविण्यात मग्न झाले होते. तीन महिन्यांच्या परिश्रमानंतर क्षत्रिय परिवाराला अमृतसरचे सुवर्णमंदिर साकारण्याचा ‘सुवर्णक्षण’ अनुभवता आला. येत्या सोमवार (दि.१)पासून येथील नृहसिंह मंदिरात सिन्नरकरांना ही अप्रतिम कलाकृती व सुमारे २५ हजार सूक्ष्म गणेशमूर्तींचा खजिना पाहण्यासाठी खुला केला जाणार आहे. क्षत्रिय गेल्या पाच वर्षांपासून गणेशोत्सवाच्या काळात सिन्नरकरांसाठी विविध कलाकृतींचा नजराणा सादर करतात. अकरा हजार बाटल्यांचे गणेशमंदिर, आगपेट्यांपासून बनविलेले दादरचे सिद्धिविनायक मंदिर, २५ किलो साबुदाण्यापासून साकारलेला ताजमहाल आणि गेल्या वर्षी कापसापासून बनविलेले दिल्लीचे अक्षरधाम मंदिर अशा एक से बढकर एक कलाकृती क्षत्रिय यांनी साकारल्या आहेत. यावर्षी त्यांनी सुवर्णमंदिर साकारण्याचा निश्चय केला आणि तो प्रत्यक्षात आणला. प्लायवूड व थर्माकोलला फेव्हिकोलने सोनेरी रंगाचे मणी चिकटविणे चिकरीचे काम होते. क्षत्रिय यांना या कामात त्यांची पत्नी वंदना, मुलगी पूजा व अक्षदा यांच्यासह प्रसाद व विशाल या पुतण्यांनी मदत केली. सुमारे तीन महिने राबराब राबून साकारलेल्या सुवर्णमंदिराची प्रतिकृती सुमारे सात फूट उंचीची आहे. यासाठी सुमारे एक बाय एक इंचाचे सुमारे २५० फूट प्लायवूड, चार बाय आठ फूटाचे दोन फोम पीस, पाच किलो फेव्हिकोल व तब्बल साडेतीन लाख सोनेरी मणी लागले. अमृतसर येथील सुवर्ण मंदिराप्रमाणे या प्रतिकृतीत तीन मोठे आणि एक छोटे प्रवेशद्वार, अकरा खिडक्या, ७१ छोटे कळस, एक मोठा घुमट, त्यापेक्षा चार लहान कळस, दुसऱ्या मजल्यावर ९ छोटे प्रवेशद्वार, ११ वेगवेगळ्या प्रकारचे झुंबर सजविण्यात आले आहेत. २० वेगवेगळ्या आकाराच्या सोनेरी मण्यांचा वापर करून हुबेहुब सुर्वणमंदिर पाहून आपसुकच क्षत्रिय यांच्या कारागिरीचे कौतुक होते. आपला रंगकाम व्यवसाय सांभाळतानाच दररोज सात ते आठ तास काम करून तीन महिन्यांच्या कालावधीत सदर प्रतिकृती साकारण्यात आली आहे. क्षत्रिय यांनी यावर्षी साकारलेली सुवर्णमंदिराची कलाकृती कलाविष्काराचा अप्रतिम नमुना म्हणावी लागेल. प्रत्यक्षात अमृतसरचे सुवर्णमंदिर पाहून जो आनंद मिळतो तोच आनंद क्षत्रिय यांनी साकारलेला कलाविष्कार पाहून मिळाल्याशिवाय राहत नाही. सदर कलाकृती सिन्नरकरांना पाहण्यासाठी येत्या सोमवारपासून (दि. १) पासून नृहसिंह मंदिरात राहणार खुली राहणार आहे. (वार्ताहर)