शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
5
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
6
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
7
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
8
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
9
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
10
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
11
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
12
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
13
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
14
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
15
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
16
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
17
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
18
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
19
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
20
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य

सिन्नरला नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 6:15 PM

प्रलंबित मागण्यांसाठी नगरपरिषदेच्या कर्मचाºयांनी परिषदेच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन केले. त्यानंतर प्रलंबित मागण्यांचे निवेदन कार्यालयीन निरीक्षक विष्णू क्षत्रिय यांना देण्यात आले.

सिन्नर : प्रलंबित मागण्यांसाठी नगरपरिषदेच्या कर्मचाºयांनी परिषदेच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन केले. त्यानंतर प्रलंबित मागण्यांचे निवेदन कार्यालयीन निरीक्षक विष्णू क्षत्रिय यांना देण्यात आले.नगरपरिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दीपक भाटजिरे, रवींद्र देशमुख, नीलेश बाविस्कर यांच्या नेतृत्त्वाखाली कर्मचाºयांनी प्रवेशद्वारात धरणे धरले. राज्यातील नगरपालिका व नगरपंचायती मधील कर्मचारी, संवर्ग कर्मचारी, सफाई कामगार, अनुकंपाधारक यांच्या प्रलंबित मागण्यांची पुर्तता न झाल्यामुळे त्या मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी करण्याकरिता १ जानेवारी २०१९ पासून बेमुदत कमबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.प्रलंबित मागण्या संदर्भात संघटनेमार्फत बरेच आंदोलने केली आहेत. पाठपुरावा केला जात आहे. परंतु नगरपरिषद व नगरपंचायत कर्मचाºयांच्या मागण्याची पुर्तता होण्यासंदर्भात नेहमीच दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. सदर कारणाने राज्यातील सर्व संघटनाचे संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य नगरपालिका कर्मचारी व संवर्ग कर्मचारी कामगार संघटना संघर्ष समितीने निर्णय घेतल्याप्रमाणे धरणे आंदोलन करण्यात आले.त्यानंतरही मागण्या मान्य न केल्यास सर्वच कर्मचारी दि २९, ३० व ३१ डिसेंबर ला काळ्या फिती लावून काम करतील आणि दि. १ जानेवारी २०१९ पासून बेमुदत कामबंद करणार आहेत. या आंदोलनाची नोटीस निवेदनाद्वारे देण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा निदवेनता देण्यात आला आहे. कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्यास नगरपरिषद मधील कर्मचारी जबाबदार राहणार नसल्याचे म्हटले आहे. त्यास प्रशासन व शासन जबाबदार राहणार असल्याचे म्हटले आहे.यावेळी अशोक कटारे, सतिश शिंदे, कमलाकर ओतारी, भीमराव संसारे, विष्णू हाडके, नीलेश चव्हाण, राजेंद्र आंबेकर, कैलास शिंगोटे, दामु भांगरे, दिलीप गोजरे, मनिलाल चौरे, मंगेश आहेर, अनिल जाधव, जावेद सैय्यद, ज्ञानेश्वर घेगडमल, दिपक गायकवाड, दीपक पगारे, ताहिर शेख, फिकरा उगले, कल्पेश उगले, राहुल आहिरे, सचिन वारु ंगसे, गोरख वाघ, बाळासाहेब भोळे, अलका पावडे, शैलेजा जाधव, वृषाली जाधव, हसन शेख, प्रकाश घेगडमल आदी उपस्थित होते. 

टॅग्स :NashikनाशिकEmployeeकर्मचारी