शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

मातृभूमीत परतल्याची भावनिक पोस्ट; अवघ्या काही तासांत गायिकेचा अपघाती मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 20:56 IST

शहापूरजवळ गाडीला अपघात; पतीवर उपचार सुरू

नाशिक: प्रसिद्ध गायिका गीता माळी यांच्या गाडीला शहापूरजवळ अपघात झाला. त्यामध्ये त्यांचं निधन झालं. तर त्यांचे पती विजय माळी जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे अपघाताच्या काही तासांपूर्वीच गीता माळी अमेरिकेतून मुंबईत दाखल झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी फेसबुकवर एक भावनिक पोस्ट लिहून आनंद व्यक्त केला होता. मात्र मुंबईहून नाशिककडे जात असताना त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. 

मुंबईहून नाशिककडे परतत असताना झालेल्या भीषण अपघातात गीता माळी यांचा मृत्यू झाला. गीता माळी गेल्या तीन महिन्यांपासून अमेरिकेत होत्या. मुंबई विमानतळावर आल्यानंतर त्यांनी फेसबुकवर काही फोटो पोस्ट केले. 'मायदेशी दाखल. जननी जन्मभूमी स्वर्ग से महान है. बऱ्याच कालावधीनंतर घरी आल्यानंतर अतिशय आनंदी आहे,' अशी पोस्ट लिहून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरील फोटो शेअर केले होते. 



मुंबईत दाखल झाल्यानंतर गीता माळी पती विजय माळींसोबत नाशिकला कारने येत होत्या. दुपारी तीनच्या सुमारास त्यांची कार ठाणे जिल्ह्यातील शहापूर परिसरात असलेल्या लाहे फाटानजीक आली असताना श्वानाला वाचवण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर जाऊन  धडकली. या घटनेत माळी यांना गंभीर दुखापत झाली होती. यानंतर त्यांना शहापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यांचे पती विजय अपघातात जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

२०१७ मध्ये ऑस्ट्रेलियामधील सिडनी शहरात वीर सावरकर विश्व साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गीता माळी यांना गायनासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं. गीता माळी यांनी संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करुन नावलौकिक मिळवला होता. त्यांच्या आकस्मिक निधनानं कला क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.  माळी यांच्या अपघाती निधनाची माहिती मिळताच सोशल मीडियावर अनेकांनी श्रद्धांजली अर्पण करत माळी यांच्या आठवणी शेअर केल्या आहे.

टॅग्स :Accidentअपघात