शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सातबारा उताऱ्यावरील नोंद रद्द प्रक्रिया सोपी

By admin | Updated: July 28, 2014 00:52 IST

शासनाचा आदेश : शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

दिंडोरी : जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील मुंबई कूळ वहिवाट व शेतजमीन १९४८ चे कलम ४३ ची नोंद (नवी शर्थ) रद्द करण्यासाठीच्या किचकट पद्धतीला शासनाने शिथिलता आणत आता गावातील तलाठ्याकडेच ही नोंद रद्द होण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहे. दिंडोरी तालुक्यात १ ते १५ आॅगस्ट दरम्यान या नोंदी रद्द करण्यासाठी विशेष राजस्व अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी मुकेश भोगे यांनी दिली.शासनाच्या या निर्णयाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, मंत्रालयाचे हेलपाटे वाचणार आहे. त्याचबरोबर यापूर्वी केवळ जमीन विकायची असेल तर नोंद कमी करता येत होती. त्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. आता ती अट शिथिल झाली असून, ज्या शेतकऱ्याच्या उताऱ्यावर नोंदी आहे त्याही कमी करता येणार आहे.दिंडोरी तहसील कार्यालयाने मंडळ अधिकारी व तलाठी यांना तशा सूचना दिल्या असून, गावोगावी खातेधारकांना सदर आदेशाची माहिती देण्यात येत आहे. १ ते १५ आॅगस्टपर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, ठिकठिकाणी शिबिरांचे आयोजन करून नोंदी रद्द करण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. कूळ वहिवाटीची अट रद्द करण्यासाठी तलाठ्या मार्फत विहित नमुन्यात अर्ज करून महसूल आकारणीच्या चाळीस पट नजराणा शेतकऱ्यांना चलनाने तहसील कार्यालयात भरावा लागणार आहे. जमीन खरेदीदार हा शेतकरी असणे गरजेचे आहे. या योजनेचा फायदा घेऊन पात्र शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी संपर्क साधून सदर नोंदी कमी करून घ्याव्या, असे आवाहन प्रांताधिकारी मुकेश भोगे यांनी केले आहे . (वार्ताहर)