शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

सिंहस्थ आटोपला....शासनाच्या निधीची अजूनही प्रतीक्षा

By admin | Updated: October 13, 2015 23:02 IST

सिंहस्थ आटोपला....शासनाच्या निधीची अजूनही प्रतीक्षा

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा पार पाडण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असे नाशिक मुक्कामी एक वेळा नव्हे, तर तब्बल दोन वेळा पुनरुच्चार करणाऱ्या शासनाने संपूर्ण कुंभमेळा पार पडल्यानंतरही मंजूर आराखड्यानुसार झालेल्या कामांवरील खर्चासाठी शासनाकडून निधीची तरतूद न केल्याने ठेकेदारांची घालमेल वाढली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी करावयाच्या विकास कामांसाठी विविध खात्यांच्या एकत्रित २३८७ कोटी खर्चाच्या आरखड्यास शासनानेच मंजुरी दिली होती व त्यानुसार साधारणत: जानेवारी महिन्यापासून कामे हाती घेण्यात आली. या कामांसाठी शासनाने एकत्रित रक्कम जिल्हा प्रशासनाकडे न पाठविता, त्या त्या खात्याने अर्थसंकल्पात पुरवणी मागण्यांच्या आधारे निधी मंजूर तो स्थानिक पातळीवर पाठविला होता, फक्तनगरविकास खात्याच्या अंतर्गत असलेल्या निधीची तरतूद जिल्हा प्रशासनाकडे म्हणजेच सिंहस्थ कुंभमेळा कक्षाकडे पाठविण्यात आली. शासनाने वेळोवेळी त्यासाठी निधी पाठविला असला तरी, साधारणत: मार्च महिन्यानंतर अनेक तातडीची व अत्यावश्यक कामांची वाढ करण्यात आली, या कामांसाठी मूळ आराखड्यात निधीची तरतूद नसल्याने ती कशी करावी असा प्रश्न तर होताच, पण आखाड्याच्या साधू-महंतांनीही ऐनवेळी अनेक मागण्या उचलून धरल्याने अनेक वाढीव कामे करावी लागली. सिंहस्थाच्या मंजूर बजेट पेक्षाही खर्चाची आकडेवारी वाढल्याने या संदर्भात पालकमंत्री तसेच मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकार निधी देईल, असे जाहीर केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरोहित संघाच्या ध्वजारोहणात व आखाड्यांच्याही ध्वजारोहणात मार्गदर्शन करताना निधीची कमतरता पडणार नाही, असा शब्द शासकीय यंत्रणेला दिला होता. प्रत्यक्षात ध्वजारोहणानंतर शासनाने एक रुपयाही वाढीव निधी मंजूर तर केलाच नाही, परंतु पैसे सुद्धा उपलब्ध करून दिलेले नाहीत. उलट ज्या खात्यांनी मूळ आराखड्यात कामे सुचविली, परंतु त्यात नंतर बदल होऊन खर्चात कपात झाली, त्यांच्याकडून माहिती मागविण्यात आली, त्यात साधारणत: ५० कोटी रुपयांच्या आसपास निधी उपलब्ध झाला. (प्रतिनिधी)