शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
4
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
5
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
6
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
7
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
8
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
9
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
10
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
12
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
13
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
14
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
15
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
16
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
17
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
18
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
19
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
20
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

वणीच्या व्यापारी बाजारपेठेत शुकशुकाट

By admin | Updated: November 12, 2016 22:56 IST

वणीच्या व्यापारी बाजारपेठेत शुकशुकाट

 वणी : ठप्प अर्थव्यवस्था, बाजारपेठेतील शुकशुकाट, प्रचंड आर्थिक तंगी अशा परिस्थितीमुळे येथील बाजारपेठेत स्मशानशांतता दिसून येत आहे. पाचशे व एक हजारच्या नोटा रद्द केल्याच्या धक्क्यातून अद्यापही काही घटक सावरले नसून मोदीच्या आर्थिक सर्जिकल स्ट्राइकपुढे भलेभले नतमस्तक झाले आहेत. बंद करण्यात आलेल्या एक हजार व पाचशेच्या नोटांवरून राजकीय पक्षात रणकंदन माजले असले तरी ग्रामीण भागात याचा मोठा फटका बसला आहे. दिवाळी मंदीच्या काळात गेल्यानंतर लग्नसराईत सुगीचे दिवस येतील या आशेने विविध व्यावसायिकांनी नियोजन आखत कर्जे, उसनवारी, भिशी अशा मार्गातून भांडवल उभे करून गुंतवणूक केली होती. मात्र चलन रद्दबातलनंतर सर्वत्र शुकशुकाट आहे. माल आहे पण ग्राहक नाही; ग्राहक आहे मात्र त्यांच्याकडे छोट्या नोटा नाहीत. त्यामुळे दुकानातील माल शोभेचे बाहुले बनला आहे. मूलभूत गरजा त्यात किराणा माल, दूध, भाजीपाला, दळणवळण या अत्यावश्यक गरजा पूर्ण करता करता सर्वसामान्य घटकाबरोबर मध्यमवर्गीय पूर्ण मेटाकुटीस आला आहे. उधारीशिवाय त्याच्या पुढे पर्याय शिल्लक राहिलेला नाही. कंपन्यांमध्ये व औद्योगिक क्षेत्रातील कामगारांचे पैसे काही कंपन्यांनी देणे लांबणीवर टाकले आहे. बांधकाम क्षेत्रातील कारागिरांचे पैसे वेळेवर अदा करणे अवघड असल्याने अल्पविरामाची परिस्थिती आहे. आज पोस्टातून एक लाख रुपयांचे वाटप करण्यात आले. प्रत्येकी दोन हजाराच्या पटीत नोटा बदलून देण्यात आल्या. (वार्ताहर )