व्रतवैकल्य सणांचा श्रावण मास यंदा घरातच होणार साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 10:24 PM2020-07-18T22:24:26+5:302020-07-19T00:36:58+5:30

नाशिक : भारतीय संस्कृतीत श्रावणमासाला आध्यात्मिक व धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. या श्रावणमासाला मंगळवारपासून प्रारंभ होत असून, या महिन्यात श्रावणी सोमवार, राखीपौर्णिमा, नागपंचमी, मंगळागौर, श्रीकृष्णजन्माष्टमी ,पोळा (पिठोरी अमावस्या) असे अनेक सण-उत्सव येतात. यानिमित्त मठ, मंदिरांमध्ये पूजा, पाठ, अभिषेक आदी धार्मिक विधी होता. यंदा मात्र या सण-उत्सवांवर कोरोनाचे मोठे सावट असून मठ, मंदिरे बंद असल्याने सर्व भाविकांना घरच्या घरीच श्रावणमास साजरा करावा लागणार आहे.

Shravan Mass of Vratvaikalya festival will be celebrated at home this year | व्रतवैकल्य सणांचा श्रावण मास यंदा घरातच होणार साजरा

व्रतवैकल्य सणांचा श्रावण मास यंदा घरातच होणार साजरा

Next

नाशिक : भारतीय संस्कृतीत श्रावणमासाला आध्यात्मिक व धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. या श्रावणमासाला मंगळवारपासून प्रारंभ होत असून, या महिन्यात श्रावणी सोमवार, राखीपौर्णिमा, नागपंचमी, मंगळागौर, श्रीकृष्णजन्माष्टमी ,पोळा (पिठोरी अमावस्या) असे अनेक सण-उत्सव येतात. यानिमित्त मठ, मंदिरांमध्ये पूजा, पाठ, अभिषेक आदी धार्मिक विधी होता. यंदा मात्र या सण-उत्सवांवर कोरोनाचे मोठे सावट असून मठ, मंदिरे बंद असल्याने सर्व भाविकांना घरच्या घरीच श्रावणमास साजरा करावा लागणार आहे.
‘श्रावण मासी हर्ष मानसी...’ असा सर्वांना आनंद देणारा श्रावण मास धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. या महिन्याला सणांचा असेही म्हटले जाते. कारण यातील प्रत्येक दिवस हा एकप्रकारे सण-उत्सवाचा असल्याने यात धार्मिक विधी व व्रतवैकल्य केल्यास अधिक लाभ होतो, अशी धारणा आहे. त्यातच नाशिकनगरी तीर्थक्षेत्र असल्याने श्रावण मासात दर सोमवारी शिवापूजन, तर मंगळवार मुली मंगळागौरीची पूजा करतात व गुरु वारी गुरुचरित्राचा पाठ, तर शुक्र वारी श्री लक्ष्मीची पूजा करतात. शनिवारी शनिदेवाला नारळ फोडतात .रविवारी आदित्याची(सूर्याची) पूजा, तर नागपंचमी या दिवशी नागाची पूजा केली जाते. नारळी पौर्णिमा ही राखी पौर्णिमा म्हणून ही ओळखले जाते. श्रावण वद्य अष्टमीला श्रीकृष्ण अष्टमी असे म्हणतात. या महिन्याच्या अमावास्येला पिठोरी अमावस्या व्रत करतात व याच दिवशी शेतकरी पोळा सण साजरा करतात.
विशेष म्हणजे श्रावणात चातुर्मासाचे महत्त्व आहे, प्रत्येक वर्षातील अशा शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या चार महिन्यांच्या काळात चातुर्मास असे म्हटले जाते. चातुर्मास काळात व पुण्यसंचय करण्याचा काळ मानला जातो. या काळात सर्व समुद्र नदी तलाव आदी ठिकाणी स्नान करणे अतिशय पुण्यकारक मानले जाते. चातुर्मासात येणारा श्रावण मास अत्यंत महत्त्वपूर्ण म्हणून ओळखल्या जातो. या काळात घरोघरी शिवलिंगाची पूजा करतात. तसेच मंदिरांमध्येदेखील धार्मिक विधी होतात. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधते, त्यासाठी एकमेकांच्या घरी जातात. परंतु कोरोनामुळे हा सणदेखील सोशल मीडियावर साजरा होईल, असे दिसून येते. नागपंचमीला नागाची पूजा करण्याची प्रथा आहे, परंतु या दिवशीदेखील महिलांना घराबाहेर पडता येणे शक्य नाही. यंदा शहरातील अनेक मंडळांनी दहीहंडीचा उत्सवदेखील रद्द करण्यात आलेला आहे.
------------
प्रत्येक श्रावणी सोमवार शिवपूजन करण्याची प्रथा असून, याच महिन्यात अनेक सण उत्सव येत असल्याने एकप्रकारे धार्मिक पर्वणीच असते. या महिन्यात बहुतेक दिवशी काही ना काही धार्मिक कृत्य सांगितले आहे. परंतु, यंदा भाविकांनी सर्व सण, उत्सव घरीच साजरे करावेत, मंदिरात गर्दी करू नये.
- रवींद्र पैठणे, वैदविद्या व धार्मिक अभ्यासक

Web Title: Shravan Mass of Vratvaikalya festival will be celebrated at home this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक