शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रीवरील काव्यपंक्तींचा वर्षाव

By admin | Updated: August 3, 2014 01:57 IST

मैत्रीवरील काव्यपंक्तींचा वर्षाव

 

नाशिक : तुझी मैत्री नक्षत्रासारखी, नेहमी न दिसणारी पण नेहमीच असणारी, माझे जीवन फुलविणारी...मैत्रीचं नातं हे पिंपळाच्या पानासारखं असावं, कितीही जाळी झाली तरी जीवनाच्या पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवायला हवं.., अशा एकापेक्षा एक सरस मराठी तसेच हिंदी, इंग्रजी भाषेतील काव्यपंक्तींच्या ओळींचा वर्षाव तरुणाईकडून फे्रन्डशिप डे अर्थात मैत्री दिनाच्या पूर्वसंध्येला सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू होता. आॅगस्ट महिन्याचा पहिला रविवार म्हटला की, मैत्री दिनाच्या निमित्ताने तरुणाईच्या आनंदाला उधाण येते. मैत्री दिनाच्या पूर्वसंध्येला कॉलेजरोड, मेनरोड, गंगापूररोड, नाशिकरोड आदि भागांतील ‘फ्रेन्डशिप बॅन्ड, रिंग’च्या खरेदीसाठी युवक-युवतींच्या झालेल्या गर्दीमुळे दुकाने गजबजलेली होती. यंदा बाजारात विविध प्रकारचे मैत्रीचे ऋणानुबंध घट्ट करणारी तसेच आपल्या मित्र-मैत्रिणींचे मने जिंकून घेणारे आकर्षक बॅन्ड विक्रीसाठी आले आहेत. हॅप्पी फ्रेन्डशिप डे, माय बेस्ट फ्रेन्ड, माय गुड फ्रेन्ड असा उल्लेख असलेल्या विविध प्रकारच्या आकर्षक पद्धतीच्या बॅन्डला तरुणाईकडून पसंती दिली जात होती. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा बॅन्डचे विविध प्रकार बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आले असले तरी त्यांच्या किंमतीमध्ये देखील वाढ झाली आहे. तरीदेखील तरुणाईचा उत्साह कमी झालेला नसल्याचे दिसून आले. तरुणाईने बॅन्ड खरेदी करण्याबरोबरच विविध प्रकारची शुभेच्छापत्रेदेखील खरेदी करण्यावर भर दिला. एकूणच तरुणाई मैत्री दिन साजरा करण्यासाठी सज्ज झाल्याचे चित्र पूर्वसंध्येलाच शहर व परिसरात पहावयास मिळाले. (प्रतिनिधी)