शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

गैरहजर ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटिसा

By admin | Updated: November 11, 2015 23:38 IST

लोकसंख्या रजिस्टर : प्रशिक्षणाला दांडी

नाशिक : राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर (एनपीआर) अद्ययावत करण्यासाठी बोलाविलेल्या प्रशिक्षणाला दांडी मारणाऱ्या प्रगणक ग्रामसेवकांना तहसीलदारांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या असून, लेखी खुलासा मागविला आहे. खुलासा न करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. देशातील प्रत्येक नागरिकाची अद्ययावत माहिती राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टरमध्ये नोंदविण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला असून, त्याचे कामही राष्ट्रीय पातळीवर सुरू झाले आहे. आधारकार्डच्या धर्तीवर राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टरचे (एनपीआर) स्वतंत्र ओळखपत्र शासनाकडून देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकाची माहिती गोळा करण्याचे काम प्रगणकांवर म्हणजेच शासकीय नोकरदारांवर सोपविण्यात आले आहे. सन २०११ मध्ये करण्यात आलेल्या जनगणनेच्या धर्तीवर हे सर्वेक्षण केले जाणार असल्याने त्यावेळी ज्या पद्धतीने सर्वेक्षण करण्यात आले, त्यासारखेच गट पाडण्यात आलेले आहेत. शिक्षकांनी सदरचे काम करण्यास नकार दिल्यामुळे आता अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, लिपिक, तलाठ्यांमार्फत हे काम करून घेण्याचे शासनाचे आदेश असल्याने त्यासाठी २ नोव्हेंबर रोजी नाशिक तहसीलदारांनी प्रगणकांची एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित केली होती; परंतु त्याकडे सुमारे ५७ ग्रामसेवकांनी पाठ फिरविली. प्रशिक्षणस्थळी घेण्यात आलेल्या हजेरीत हा प्रकार उघडकीस आल्यावर या सर्वांना नोटिसा पाठवून लेखी खुलासा मागविण्यात आला आहे. दिवाळीच्या सुट्या आटोपल्यावर व नोव्हेंबर अखेरपर्यंत सदरचे काम पूर्ण करण्याचे शासनाचे आदेश आहेत.