पहिल्या दिवशी उंटवाडी शाळेत अल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:43 IST2021-02-05T05:43:22+5:302021-02-05T05:43:22+5:30

बुधवारी पहिल्या दिवशी इ. ५ वी चे ११० तर ६ वी चे १२५ असे २३५ विद्यार्थी उपस्थित ...

Short response to camel school on first day | पहिल्या दिवशी उंटवाडी शाळेत अल्प प्रतिसाद

पहिल्या दिवशी उंटवाडी शाळेत अल्प प्रतिसाद

बुधवारी पहिल्या दिवशी इ. ५ वी चे ११० तर ६ वी चे १२५ असे २३५ विद्यार्थी उपस्थित होते. मुख्याध्यापिका ज्योती कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षितता घेण्यात आली. संपूर्ण शाळा सॅनिटाईज करण्यात आली. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने शाळेच्या मुख्य गेटवर विद्यार्थी तापमान व ऑक्सिजन लेव्हल तपासण्यात आली तसेच विद्यार्थ्यांचे हात सॅनिटाईज करून फिजिकल डिस्टन्स ठेऊन विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश देण्यात आला. प्रत्येक वर्गात इयत्तेनिहाय २० विद्यार्थी बसतील, अशी व्यवस्था करण्यात आली होती.

संस्थेच्या वतीने कार्यवाह राजेंद्र निकम, शिक्षक मंडळ अध्यक्ष लक्ष्मण जाधव, कार्यकारिणी सदस्य चंद्रशेखर वाड यांनी उपस्थित विद्यार्थी व सुरक्षितता याबाबत आढावा घेतला. शाळा सुरू झाल्याबद्दल विद्यार्थी , पालक , शिक्षक यामध्ये आनंदाचे असल्याचे दिसून आले. (२७ सिडको स्कूल)

Web Title: Short response to camel school on first day