शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचा स्वबळावर लढण्याचा नारा

By admin | Updated: January 20, 2017 00:20 IST

बागलाण : ताहाराबाद येथे संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत बैठक

 सटाणा : बागलाण तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपावरून कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस यांनी आघाडीची बिघाडी होण्याचे संकेत दिले आहेत, तर भाजपा व सेनेमध्येही युतीसाठी अनुकूल वातावरण नसून त्यांच्यामध्येही मानसन्मानावरून तणातणी सुरू असल्याचे चित्र असून, सेनेचे संपर्कप्रमुख सुहास सामंत यांनी पक्षाची ताकद वाढविण्यासाठी शिवसैनिकांना स्वबळाचा नारा देतानाच, इच्छुकांनी वेळ न दवडता प्रचाराला लागावे, असे आवाहन केले आहे. संपर्कप्रमुखांच्या या आवाहनामुळे भाजपा व शिवसेना युतीची शक्यता धूसर झाली आहे.ताहाराबाद येथे सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत बागलाणमध्ये भाजपा व मित्रपक्षांशी युती करायची की स्वबळावर लढायचे याबाबत स्थानिक पदाधिकाऱ्यांशी विचारविनिमय करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस ग्रामीण जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, जिल्हा उपप्रमुख लालचंद सोनवणे, सुभाष नंदन, शरद शेवाळे, नामपूर बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब कापडणीस, पप्पू बच्छाव उपस्थित होते.बैठकीच्या प्रारंभी विधानसभा निवडणुकीत दिलेल्या उमेदवाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. पालिका निवडणुकीत भाजपाशी युती करण्यासंदर्भात स्थानिक पदाधिकाऱ्यांशी अखेरपर्यंत बोलणी सुरू होती. मात्र ऐनवेळी दोन-तीन जागा देण्याची भाषा करून आपली फसवणूक केली. त्यामुळे स्वबळावर लढण्याचा पवित्रा उपस्थित पदाधिकारी व शिवसैनिकांनी घेतला. भाजपाने ब्राह्मणगाव, पठावे दिगर, ताहाराबाद, वीरगाव असे तीन गट सेनेला सोडून सन्मानाने युती करावी, असा प्रस्ताव नंदन यांनी ठेवला.