शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

गोवर्धन गटातून शिवसेनेचे चारोस्कर विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 01:25 IST

जिल्हा परिषदेच्या गोवर्धन गटातून शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र अशोक चारोस्कर हे २३७ मतांनी विजयी झाले असून, त्यांनी राष्टÑवादीचे उमेदवार प्रभाकर गुंबाडे यांचा पराभव केला. या निवडणुकीत भाजपचा उमेदवार चौथ्या क्रमांकावर राहिला. विशेष म्हणजे मतमोजणीच्या पाचव्या फेरीपर्यंत राष्टÑवादीचे उमेदवार पाचशे मताधिक्क्याने आघाडीवर होते. मात्र सहाव्या फेरीने चारोस्करांना हात देत विजयाची माळा गळ्यात घातली.

ठळक मुद्देराष्टÑवादीचा पराभव : भाजप चौथ्या क्रमांकावर

नाशिक : जिल्हा परिषदेच्या गोवर्धन गटातून शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र अशोक चारोस्कर हे २३७ मतांनी विजयी झाले असून, त्यांनी राष्टÑवादीचे उमेदवार प्रभाकर गुंबाडे यांचा पराभव केला. या निवडणुकीत भाजपचा उमेदवार चौथ्या क्रमांकावर राहिला. विशेष म्हणजे मतमोजणीच्या पाचव्या फेरीपर्यंत राष्टÑवादीचे उमेदवार पाचशे मताधिक्क्याने आघाडीवर होते. मात्र सहाव्या फेरीने चारोस्करांना हात देत विजयाची माळा गळ्यात घातली.गोवर्धन गटातून राष्टÑवादी कॉँग्रेसकडून निवडून आलेले हिरामण खोसकर यांनी विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने त्यांनी आपला राजीनामा सादर केला होता. राज्यात महाआघाडी अस्तित्वात आल्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी व कॉँग्रेसच्या वतीने एकच उमेदवार देण्याचा प्रयत्न झाला, परंतु तो फोल ठरल्यामुळे राष्टÑवादीने प्रभाकर गुंबाडे यांना उमेदवारी दिली तर शिवसेनेनेही राजेंद्र अशोक चारोस्कर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले.भाजपने दौलत ससाणे यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे सेनाविरुद्ध राष्टÑवादीविरुद्ध भाजप अशी लढत झाली. या गटासाठी गुरुवारी मतदान घेण्यात आले. त्यात एकूण १३ हजार ४२२ मतदारांनी म्हणजेच ४३ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. त्याची मोजणी शुक्रवारी सकाळी नाशिक तहसीलदार कार्यालयात करण्यात आली. त्यासाठी सहा टेबल लावण्यात आले होते.चारोस्कर विजयी झाल्याचे घोषित करण्यात येत असतानाच, राष्ट्रवादीने मतमोजणीला आक्षेप घेत फेर मतमोजणीची मागणी केली त्यावरून काही वेळ तणाव निर्माण झाला.अखेर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेरमतमोजणीची मागणी मान्य करीत, पुन्हा मोजणीला सुरुवात केली. परंतु त्यातही निकाल कायम राहिल्याने शिवसेनेने जल्लोष साजरा केला. या निवडणुकीत राजेंद्र चारोसकर यांना ४२९० मते मिळाली, तर राष्टÑवादीचे प्रभाकर गुंबाडे यांना ४०५३ मते मिळून दुसºया क्रमांकावर अपक्ष उमेदवार बारकू परशुराम डहाळे यांना तिसºया क्रमांकाची ३,३३५ मते मिळाली तर भाजपचे दौलत भीमा ससाणे यांना १६१७ मते मिळून ते चौथ्या क्रमांकावर राहिले. १२७ मतदारांनी नोटाचा वापर केला.शेवटच्या फेरीत विजयमतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच राष्टÑवादीचे उमेदवार गुंबाडे हे आघाडीवर होते. सलग पाचव्या फेरीपर्यंत त्यांनी आघाडी कायम ठेवल्याने राष्ट्रवादीच्या नेत्या, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. काही उत्साही कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळणही सुरू केली. मात्र शेवटच्या सहाव्या फेरीत शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र चारोस्कर यांनी गुंबाडे यांना मागे सारत थेट २३७ मतांची आघाडी घेऊन विजश्री खेचून आणली.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदElectionनिवडणूक