शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना करणार २५ सदस्यांचा सत्कार

By admin | Updated: February 26, 2017 00:36 IST

सोमवारी येणार सर्व सदस्य एकत्र

नाशिक : जिल्हा परिषदेत सर्वाधिक २५ सदस्य निवडून आलेल्या शिवसेनेमध्ये उत्साहाचे वातावरण असून, आगामी २१ मार्च रोजी भगवा फडकविण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करण्यात येणार असल्याचे समजते. दरम्यान, येत्या सोमवारी (दि.२७) नाशिकमध्ये शिवसेनेकडून निवडून आलेल्या सर्व २५ जिल्हा परिषद सदस्यांचा ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते, तसेच जिल्हाप्रमुख सुहास कांदे, भाऊलाल तांबडे, विजय करंजकर, खासदार हेमंत गोडसे, आमदार अनिल कदम, आमदार राजाभाऊ वाजे, आमदार योगेश घोलप यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात येणार आहे.  जिल्हा परिषदेत पेठ तालुक्यातून तालुकाप्रमुख भास्कर गावित व त्यांच्या स्नुषा हेमलता गावित सलग दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेत निवडून आल्या आहेत. तसेच शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले हे दिंडोरी तालुक्यातील खेड गटातून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भास्कर भगरे यांना पराभूत करून विजयी झाले आहेत. शिवसेनेचे सर्वाधिक सदस्य सिन्नर तालुक्यातून पाच तर त्या खालोखाल दिंडोरीतून चार आणि इगतपुरी व येवल्यातून प्रत्येकी तीन सदस्य निवडून आले आहेत. त्या खालोखाल नांदगाव व मालेगावमधून प्रत्येकी दोन तर चांदवडमधून एक जिल्हा परिषद सदस्य निवडून आले आहेत. निवडून आलेल्या या सर्व २५ सदस्यांचा सत्कार करून पुढील नियोजनासाठी सोमवारी सेना नेत्यांंनी बैठकीचे आयोजन केले आहे. (प्रतिनिधी)