पत्ता विचारण्याच्या बहाण्याने पोत खेचली

By Admin | Updated: September 16, 2014 00:26 IST2014-09-15T00:49:01+5:302014-09-16T00:26:25+5:30

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने पोत खेचली

Shipped the vessel to address the address | पत्ता विचारण्याच्या बहाण्याने पोत खेचली

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने पोत खेचली


नाशिक : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने आलेल्या दुचाकीवरील दोघांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचल्याची घटना कोणार्कनगरमध्ये घडली़ याबाबत अधिक माहिती अशी की, लता शशिकांत गुंजाळ (४८, तुळजाई मंगल कार्यालय, श्रीरामनगर, गौरी गणेश रो-हाऊससमोर, आडगाव) या शनिवारी सकाळी पावणेबारा वाजेच्या सुमारास कोणार्कनगर येथील दत्त मंदिराच्या मागील बाजूच्या रस्त्यावरून पायी जात होत्या़ त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांना हे नगर कोणते आहे याची विचारणा करून त्यातील एकाने गळ्यातील २० हजार रुपये किमतीची सोन्याची १५ ग्रॅमची सोन्याची पोत खेचून पसार झाले़ या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: Shipped the vessel to address the address