शहरं
Join us  
Trending Stories
1
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
2
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
3
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
4
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
5
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
6
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
7
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
8
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
9
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
10
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
11
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
12
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
13
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
14
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
15
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
16
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
17
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
18
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
19
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
20
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

शिखरेवाडी मैदानाची वाताहत

By admin | Updated: July 20, 2014 01:42 IST

पालिका, पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष : मद्यपी, प्रेमीयुगुल, टवाळखोरांचा सर्रास वावर

 

नाशिकरोड : शिखरेवाडी मैदानाकडे मनपा प्रशासन व नगरसेवकांकडून दुर्लक्ष केले जात असल्याने मैदानातील विविध सोयी-सुविधांची वाताहत होऊ लागली आहे. मैदानावरील मद्यपी, प्रेमीयुगुल व रायडर्सना रोखण्यात पोलीस प्रशासनाला अपयश आले आहे. पोलिसांनी अशा टवाळखोरांना ‘खाकी’चा हिसका दाखवावा, अशी मागणी परिसरातील रहिवाशांकडून केली जात आहे.
शिखरेवाडी येथील मनपाच्या मैदानावर लाखो रुपये खर्च करून जॉगिंग ट्रॅक, वृक्षारोपण, मुलांना खेळण्यासाठी खेळणी, व्यायामाचे साहित्य, ग्रीन जिम, बसण्यासाठी बाकडे आदि सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून दररोज शेकडो नागरिक, महिला फिरण्यासाठी, व्यायामासाठी येतात. तर युवक, मुले खेळण्यासाठी येतात.
मनपाचे दुर्लक्ष
मात्र गेल्या काही दिवसांपासून मनपा प्रशासन व नगरसेवकांनी मैदानाकडे दुर्लक्ष केल्याने विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. गंधर्वनगरी व शिखरेवाडी येथील मैदानाच्या प्रवेशद्वाराचे कुलूप मद्यपी व दुचाकी रायडर्सनी तोडून टाकल्याने प्रवेशद्वार ‘सताड’ उघडे आहे. यामुळे ‘आओ जाओ घर तुम्हारा,’ अशी परिस्थिती झाली आहे. दिवसभर मैदानावरील झाडाझुडपांत व भिंतीच्या कोनाड्यात प्रेमीयुगुल अश्लील चाळे करत असतात. त्यामुळे मैदानावर फिरायला, खेळायला येणाऱ्यांना लाज वाटते, मात्र त्या प्रेमीयुगुलांना त्याच्याशी काही देणेघेणे नाही. सायंकाळनंतर मैदान हे मद्यपींसाठी सध्या मेजवानी ठरले आहे. ठिकठिकाणी युवकांचे टोळके दारू पिण्यास बसलेले असतात. दारू पिऊन झाली की, त्या बाटल्या तेथेच फोडतात. त्यामुळे मैदानावर फिरायला व खेळायला येणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मद्यपी, प्रेमीयुगुलांना आवर घालण्याची गरज आहे. तसेच मैदानावर दुचाकीचे स्टंट करणाऱ्या रायडर्सनादेखील झटका देण्याची गरज आहे. मैदानावर वाहने शिकण्यास येणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली पाहिजे. (प्रतिनिधी)४मैदानावर मद्यपींमध्ये होणारे वादविवाद, शिवीगाळ, मारामाऱ्या यामुळे सर्वचजण त्रस्त झाले आहेत. धूमस्टाईल दुचाकी रायडर्सची स्टंटबाजी, प्रेमीयुगुलांचे अश्लील चाळे, भुरटे चोर यामुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे, अशा टवाळखोरांना ‘खाकी’चा हिसका दाखविण्याची गरज निर्माण झाली असल्याची चर्चा परिसरात होत आहे. त्याचबरोबर पोलिसांची दिवस-रात्रीची गस्तही वाढवावी. पोलीस उपआयुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी स्वत: जातीने लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. ४मैदानावरील व्यायामाचे व खेळण्याचे लोखंडी साहित्य भुरट्या चोरट्यांनी चोरून नेले आहे. काही ठिकाणी संरक्षक भिंतीची जाळी व लोखंड चोरून नेले आहे. मैदान व त्यावरील विविध सोयी-सुविधांची दररोज होणारी वाताहत पाहून परिसरातील रहिवाशांमध्ये हळहळ व संताप व्यक्त केला जात आहे. मनपाने त्वरित मैदानाचे प्रवेशद्वार बंद करून खेळणी व व्यायामाचे साहित्य दुरुस्त करून द्यावे, अशी मागणी खेळाडू व फिरायला, व्यायामास येणाऱ्या नागरिक, महिलांनी केली आहे.