शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

नाशिक प्रादेशिक वनविभागाच्या मुख्य वनसंरक्षकपदी शेळके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 10:35 PM

नाशिक : नाशिक प्रादेशिक वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक एस.व्ही.रामाराव यांची चंद्रपूर प्रादेशिकच्या मुख्य वनसंरक्षकपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्त झालेल्या पदी चंद्रपूरचे व्ही.एस.शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नाशिक वनविभागातील विभागीय वनधिकारी (दक्षता) व्ही.टी.घुले यांची शहापूर येथील उपवनसंरक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर येथील उपवनसंरक्षक जी.मल्लिकार्जुन यांची नाशिकच्या कार्यआयोजना ...

ठळक मुद्देनाशिकच्या कार्यआयोजना विभागातील उपवनसंरक्षकपदी जी.मल्लिकार्जुन नाशिक विभागीय वनधिकारी व्ही.टी.घुले यांची शहापूर उपवनसंरक्षकपदी नियुक्ती

नाशिक : नाशिक प्रादेशिक वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक एस.व्ही.रामाराव यांची चंद्रपूर प्रादेशिकच्या मुख्य वनसंरक्षकपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्त झालेल्या पदी चंद्रपूरचे व्ही.एस.शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नाशिक वनविभागातील विभागीय वनधिकारी (दक्षता) व्ही.टी.घुले यांची शहापूर येथील उपवनसंरक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर येथील उपवनसंरक्षक जी.मल्लिकार्जुन यांची नाशिकच्या कार्यआयोजना विभागातील उपवनसंरक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या महसूल व वन विभागाच्या वतीने भारतीय वनसेवा व राज्य वनसेवेतील एकूण २८ वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदोन्नती व बदल्या प्रशासकीय कारणास्तव करण्यात आल्या आहेत. त्याबाबतचा अध्यादेश महसूल व वनमंत्रालयाकडून मंगळवारी जाहीर करण्यात आला. यामध्ये मुख्य वनसंरक्षक, उपवनसंरक्षकचा समावेश आहे.यात अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक ए.एन. त्रिपाठी (कार्य आयोजना, पुणे), मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी (एपीसीसीएफ, मुंबई), लोकसेवा आयोग सचिव प्रदीप कुमार (वनविकास, नागपूर), मुख्य वनसंरक्षक बी. एस. हुडा (एपीसीसीएफ, नागपूर), मुख्य वनसंरक्षक एस.व्ही. रामाराव (चंद्रपूर, प्रादेशिक), मुख्य वनसंरक्षक व्ही. एस. शेळके (नाशिक, प्रादेशिक), मुख्य वनसंरक्षक मुकुल त्रिवेदी (नागपूर, वनविनियम), मीरा अय्यर (मानव संसाधन विकास, नागपूर), वनसंरक्षक एन. आर. प्रवीण (ताडोबा अंधारी-व्याघ्र प्रकल्प), उपवनसंरक्षक जी. पी. नरवणे (मध्य चांदा, प्रादेशिक), गजेंद्र हिरे (ताडोबा अंधारी-व्याघ्र प्रकल्प), भरतसिंह हाडा (सातारा, प्रादेशिक), ए. एम. अंजनकर (नाशिक, वन्यजीव), एच. जी. धुमाळ (कोल्हापूर, प्रादेशिक), प्रभुदास शुक्ला (नागपूर, प्रादेशिक), जी. मल्लिकार्जुन (नाशिक कार्य आयोजना), पी.टी. मोरणकर (यावल, प्रादेशिक), एस. एस. दहीवले (अमरावती कार्य आयोजना), एन.ए.विवरेकर (वडसा, प्रादेशिक), व्ही.एम. गोडबोले (नागपूर भूमिअभिलेख), व्ही. एन. हिंगे (बल्लारशाह), सी. एल. धुमाळ (कुंडल, विकास प्रबोधिनी), व्ही. बी. जावळेकर (अमरावती, प्रादेशिक), व्ही.जे. भिसे (डहाणू, प्रादेशिक), एन.एस. लडकर (ताडोबा अंधारी-व्याघ्र प्रकल्प), किशोर मानकर (नागपूर संसाधन उपयोग), व्ही. टी. घुले (शहापूर, प्रादेशिक), डी. पी. निकम (औरंगाबाद कार्य आयोजना) यांचा समावेश आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रforest departmentवनविभागNashikनाशिक