शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

शेख यांनी पहिल्या फेरीतच घेतली आघाडी

By admin | Updated: October 20, 2014 00:11 IST

शेख यांनी पहिल्या फेरीतच घेतली आघाडी

मालेगाव : येथील मालेगाव मध्यमधून कॉँग्रेस उमेदवार माजी महापौर आसिफ शेख विजयी झाले. त्यांनी कॉँग्रसचे उमेदवार विद्यमान आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद ईस्माईल यांचा १६ हजार १५१ मतांनी पराभव केला. मालेगाव मध्यमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी संदीप पाटील यांनी त्यांच्या विजयाची घोषणा करत त्यांना विजयाचे प्रमाणपत्र बहाल केले. मतमोजणीच्या केवळ १६ फेऱ्या असताना व जिल्ह्यात सर्वांत आधी येथील निकाल अपेक्षित असताना स्थानिक प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे मालेगाव मध्यचा निकाल सर्वांत उशिरा म्हणजे दुपारी जवळपास पाऊण वाजेच्या सुमारास घोषित करण्यात आला. सकाळी ८ वाजता येथील छत्रपती श्री शिवाजी जिमखान्यात कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतमोजणीस प्रारंभ झाला. सर्वप्रथम पोस्टल मतमोजणी करण्यात आली. त्यानंतर सव्वाआठच्या सुमारास इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची मतमोजणीस सुरुवात करण्यात आली. कॉँग्रेस उमेदवार आसिफ शेख यांनी पहिल्या फेरीतच आपले प्रतिस्पर्धी उमेदवार मौलाना मुफ्ती मोहंमद ईस्माईल यांच्यावर चार हजार ८८४ मतांची आघाडी घेतली. पाचव्या फेरीअखेर ही आघाडी १६ हजार २७६ मतांपर्यंत होती. सहाव्या ते आठव्या फेरीपर्यंत ही आघाडी ११ हजार १४५ मतांपर्यंत कमी झाल्यामुळे आमदार मौलांना समर्थकांच्या आशा पल्लवित झाल्या; परंतु त्यानंतर पुन्हा आसिफ शेख यांना दहाव्या फेरीअखेर १६ हजार ५५७ मतांची आघाडी मिळाली. उर्वरित फेऱ्यांपर्यंत ही आघाडी मोडणे अशक्य असल्याचे लक्षात आल्यानंतर आमदार मौलाना यांच्या उरल्या सुरल्या समर्थकांनीही मतदान केंद्रातून काढता पाय घेतला.