शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

धनंजय मुंडे यांना सावानाचा कार्यक्षम आमदार पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 3:58 PM

घोषणा : ४ मार्चला शरद पवारांच्या हस्ते वितरण

ठळक मुद्दे सावानाच्यावतीने माजी आमदार व पत्रकार कै. माधवराव लिमये यांच्या स्मृतिप्रित्यर्थ गेल्या १६ वर्षांपासून हा पुरस्कार दिला जातो.

नाशिक : १७९ वर्षांची वैभवशाली परंपरा असलेल्या येथील सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने देण्यात येणारा यंदाचा कार्यक्षम आमदार पुरस्कार महाराष्ट विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते व राष्टवादीचे नेते धनंजय मुंडे यांना घोषित करण्यात आला आहे. सोमवार दि. ४ मार्च रोजी राष्टवादीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.सावानाचे प्रमुख सचिव श्रीकांत बेणी यांनी कार्यक्षम आमदार पुरस्काराची घोषणा केली. सावानाच्यावतीने माजी आमदार व पत्रकार कै. माधवराव लिमये यांच्या स्मृतिप्रित्यर्थ गेल्या १६ वर्षांपासून हा पुरस्कार दिला जातो. ५० हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. कै. लिमये यांच्या कन्या डॉ. शोभाताई नेर्लीकर व जावई विनायक नेर्लीकर यांच्या देणगीतून हा पुरस्कार देण्यात येतो. पुरस्कार निवड समितीचे सदस्य आमदार हेमंत टकले, महाराष्ट टाईम्सचे कार्यकारी संपादक शैलेंद्र तनपुरे, सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, प्रमुख सचिव श्रीकांत बेणी, डॉ. नेर्लीकर दाम्पत्य यांच्या निवड समितीने मुंडे यांची पुरस्काराकरीता निवड केली. धनंजय मुंडे यांनी १९९५ च्या विधानसभा निवडणुकीपासून राजकारणात प्रत्यक्ष सहभाग घेतला. भाजपा विद्यार्थी आघाडी प्रमुख, भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष आदी पदे त्यांनी भूषविली. मुंडे यांनी बीड जिल्हा परिषदेतही ९ वर्षे सदस्य म्हणून काम पाहिले. २०१० मध्ये त्यांची विधानपरिषदेवर निवड झाली. दरम्यान, त्यांनी भाजपातून राष्ट्रवादीत प्रवेश केला. सध्या ते महाराष्टÑ विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. धनंजय मुंडे यांना विधिमंडळातील अभ्यासू वक्ता म्हणून २०१७ मध्ये लोकमतच्यावतीनेही पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. याशिवाय, २०१८ चा लोकमततर्फेच दिला जाणारा पॉवरफूल राजकारणी म्हणूनही पुरस्कार प्राप्त झालेला आहे.पुरस्काराने सन्मानितगेल्या सोळा वर्षांत आमदार बी. टी. देशमुख, गणपतराव देशमुख, आर. आर. पाटील, प्रमोद नवलकर,शोभाताई फडणवीस, जीवा पांडू गावीत, दत्ताजी नलावडे, गिरीश बापट, सा. रे. पाटील, पांडुरंग फुंडकर, जयंतराव पाटील, देवेंद्र फडणवीस, बाळासाहेब थोरात, बच्चू कडू, डॉ. निलम गो-हे आणि गिरीश महाजन यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.

टॅग्स :NashikनाशिकDhananjay Mundeधनंजय मुंडे