शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
5
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
6
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
7
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
8
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
9
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
10
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
11
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
12
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
13
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
14
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
15
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
16
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
17
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
18
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
19
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
20
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार : जैतापूरला राष्ट्रवादीचा पाठिंबा

By admin | Updated: April 12, 2015 00:48 IST

विरोध करण्यापेक्षा सेनेने सत्तेतून बाहेर पडावे

नाशिक : एकीकडे केंद्रात व राज्यात सत्तेत राहायचे आणि दुसरीकडे राज्याच्या विकासासाठी एखादा प्रकल्प उभा राहत असेल तर, त्याला विरोध करायचा. त्यापेक्षा शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावे, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेवर केली आहे.तसेच स्वस्त आणि राज्याच्या विकासासाठी आवश्यक असलेली वीज जैतापूर प्रकल्पातून मिळणार असेल तर, आमचे सरकारला सहकार्यच असेल, अशा शब्दात शरद पवार यांनी जैतापूर प्रकल्पाला राष्ट्रवादीचा पाठिंबाच असेल, असे सांगत एकप्रकारे पुन्हा एकदा शिवसेनेला एकटे पाडत भाजपाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे.तारापूर अणुप्रकल्पातून राज्याला स्वस्त व पर्यावरणाला कोणतीही हानी न पोहोचवता वीज मिळते आहे. त्यामुळे राज्याचा विकास होतो आहे. जर अशीच वीज जैतापूर अणूप्रकल्पातून उपलब्ध होणार असेल तर त्याला आपल्या पक्षाचा पाठिंबाच असेल. हा प्रकल्प महाराष्ट्राच्या हिताचा असल्याने आमची सरकारला सहकार्याचीच भूमिका राहील. उलट जे सरकारमध्ये सामील आहेत त्यांनी विरोध करणे ही गोष्ट चुकीची आहे. एकीकडे राज्यात आणि केंद्रात सत्तेत राहायचे आणि दुसरीकडे सरकारलाच विरोध करायचा, ही गोष्ट चुकीची असल्याचे सांगत सेनेने आधी सत्तेतून बाहेर पडावे मग विरोध करावा, असे पवार यांनी सांगितले.(प्रतिनिधी)