शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कसबे सुकेणे, ओझर बाजारपेठांमध्ये मंदी

By admin | Updated: November 12, 2016 22:12 IST

कसबे सुकेणे, ओझर बाजारपेठांमध्ये मंदी

कसबे सुकेणे : परिसरातील विविध बँकांमध्ये पाचशे आणि हजारच्या नोटा बदलविण्यासाठी सलग दुसऱ्या दिवशी ग्राहकांची गर्दी कायम असून, काम-धंदे सोडून नागरिक बँकांपुढे रांगा लावत नोटा बदलविण्याची दिवस घालवत आहेत. तालुक्यातील सुकेणे, सायखेडा, ओझर या बाजारपेठांमध्ये मंदी पसरली आहे़हजार आणि पाचशेच्या नोटा बदलामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यव्यस्था पुरती कोलमडली असून, व्यवहार ठप्प झाले आहे. एटीएम बंद, हजार आणि पाचशे नोटाचा प्रश्न, शंभरच्या नोटांची टंचाई आणि सुट्यांवरून होणारे वाद याचे पडसाद या भागातील बाजारपेठांवर होत असून, बाजारात मंदीचे सावट दिसत आहे़ मजूर आणि सर्वसामान्य बांधवांना हजार आणि पाचशे नोटांचे सुटते करण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत असून, पेट्रोल पंपांवर कितीचे पेट्रोल टाकायचे, हा प्रश्न आहे. अनेकांना केलेल्या कामाचे पेमेंट मिळत नसल्याने व्यव्यहार ठप्प झाले आहेत. अनेकांनी आज कामावर दांडी मारत बँकांपुढे नोटा बदलविण्यात दिवस घालविला. बँकांनी काही ठिकाणी ग्राहकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली सर्व राष्ट्रीयीकृत बँकांपुढे शनिवारी लांबच लांब रांगा होत्या़ (वार्ताहर)