शहीद ठोक कुटुंबीयांना मदत

By Admin | Updated: October 21, 2016 01:40 IST2016-10-21T01:38:58+5:302016-10-21T01:40:08+5:30

शहीद ठोक कुटुंबीयांना मदत

Shaheed Help in the family | शहीद ठोक कुटुंबीयांना मदत

शहीद ठोक कुटुंबीयांना मदत

पाथरे : सिन्नर तालुक्यातील देवपूर येथील देवपूर विद्यालय, एस.जी. कनिष्ठ महाविद्यालय आणि ग्रामस्थांच्या वतीने शहीद जवान संदीप ठोक यांच्या कुटुंबीयांना रोख ११ हजार रुपयांची मदत करण्यात आली.
माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष दौलत मोगल यांच्या मार्गदर्शनाखाली देवपूर विद्यालयाच्या वतीने गावातून मदतफेरी काढून आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले. ‘शहीद संदीप ठोक अमर रहे’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणांचे फलक विद्यार्थ्यांनी हातात घेतले होते. शनि मंदिराजवळ सभा घेऊन शहीद संदीप यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. शहीद संदीप यांच्या हौतात्म्याचा आपल्याला अभिमान असून, तरुणांसाठी ते प्रेरणादायी असल्याचे माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे संचालक विजय गडाख म्हणाले. (वार्ताहर)


 

Web Title: Shaheed Help in the family