सात जणांनी तलवारींनी केला हल्ला, तरुणाचा जागेवरच घेतला जीव, दुसरा गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 17:32 IST2026-03-25T17:32:08+5:302026-03-25T17:32:52+5:30
धारदार तलवारीने तर रियाज मोहमद, रिजवान यांनी कोयत्याने व अन्य संशयितांनी सलीम याच्यावर हल्ला केला.

सात जणांनी तलवारींनी केला हल्ला, तरुणाचा जागेवरच घेतला जीव, दुसरा गंभीर जखमी
Crime News: मालेगाव शहरातील अख्तराबाद येथे मागील भांडणाची कुरापत काढून सात जणांनी दोघांवर जीवघेणा हल्ला करीत एकाला ठार मारले तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या भागात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.
फिर्यादीचा भाऊ शेख सलीम शेख चाँद व त्याचा मित्र फैयाज अहमद मोहमद आमीन (रा. ५२ खोली, बडा कब्रस्तान) हे दोघे अख्तराबादमधील बिडी गोडावूनजवळ उभे असताना सात संशयित लाठ्या, काठ्या, कोयता, तलवार घेऊन तेथे आले.
त्यांनी कुरापत काढून दोघांवर हल्ला केला. कलिम नाट्या याने त्याच्या धारदार तलवारीने तर रियाज मोहमद, रिजवान यांनी कोयत्याने व अन्य संशयितांनी सलीम याच्यावर हल्ला करत त्याला ठार मारले.
त्यांनी फैयाज याच्यावरही प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यानंतर संशयित फरार झाले आहेत. शेख हनिफ शेख चाँद उर्फ राजू यांनी मतीन मुल्ला (पूर्ण नाव माहीत नाही), कलिम मतीन मुल्ला उर्फ कलिम नाट्या, शोएब अली, बिलाल, रियाज मोहमद, रिजवान व सैफ अली (रा. सर्व, मालेगाव) यांच्याविरुद्ध पवारवाडी पोलिसांत तक्रार दिली आहे. दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.