शहरं
Join us  
Trending Stories
1
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगालमध्ये आणखी एका भाजपा उमेदवाराच्या कारवर हल्ला
3
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
4
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, फोडल्या काचा
5
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
6
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
7
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
8
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
9
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
10
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
11
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
12
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
13
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
14
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
15
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
16
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
17
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
18
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
19
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
20
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
Daily Top 2Weekly Top 5

पशुपक्ष्यांसाठी केली पाण्याची व्यवस्था

By admin | Updated: April 8, 2017 23:49 IST

वणी : भातोडे येथील ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याची सोय पाणवठ्याच्या माध्यमातून करून पशुपक्ष्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत भूतदया जोपासली आहे.

वणी : उन्हाचा तडाखा व पाण्याची टंचाईचा सामना केवळ मानवी जीवच करीत नाही तर पशुपक्ष्यांनाही याची तीव्रता जाणवते. पशुपक्ष्यांसाठी भातोडे येथील ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याची सोय पाणवठ्याच्या माध्यमातून करून पशुपक्ष्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत भूतदया जोपासली आहे.साताशिखरातील पर्वत रांगांमधील मार्कंडेय पर्वताच्या पायथ्याशी भातोडे गाव असून, उन्हाळ्यात पाण्याच्या तीव्रतेचा सामना या गावालाही करावा लागतो. हातपंप व शेतजमिनीतील विहिरीतून पाण्याची गरज भागविली जाते. दरम्यान, अशाच पद्धतीच्या पाणीटंचाईचा सामना पशुपक्ष्यांनाही करावा लागतो. त्यात जशीजशी उन्हाची तीव्रता वाढते तसतसे वन्यजीव पाण्याच्या शोधार्थ पर्वतरांगातून व जंगली भागातून भटकंती करत मानवी वस्त्यांपर्यंत येऊन पोहचतात. यामुळे भीतीचे वातावरण अशा स्थितीत निर्माण होते. या सगळ्या बाबी विचारात घेऊन गावापासून दोन किलोमीटर अंतरावर २० बाय १०अंतराचा व १ फूट खोल खड्डा श्रमदानाने तयार करून सुमारे तीनशे मीटर अंतरावरील पवारवस्तीतून विद्युत पंपाद्वारे यात पाणी सोडण्यात येते. सुमारे तीन हजार लिटर इतकी क्षमता या पाणवठ्याची आहे. विहिरीने तळ गाठण्यास प्रारंभ केल्याने शेती सांभाळून पाइपलाइनद्वारे पाणी या ठिकाणी पोहचविणे काही दिवसात जिकिरीचे ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत प्राप्त होत आहेत तरीही वन्यजीव पशुपक्षी यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करणाऱ्या भातोडा ग्रामस्थांचा उपक्रम स्तुत्य असाच आहे. (वार्ताहर)