पशुपक्ष्यांसाठी केली पाण्याची व्यवस्था

By Admin | Updated: April 8, 2017 23:49 IST2017-04-08T23:49:43+5:302017-04-08T23:49:59+5:30

वणी : भातोडे येथील ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याची सोय पाणवठ्याच्या माध्यमातून करून पशुपक्ष्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत भूतदया जोपासली आहे.

Settlement arrangements for livestock | पशुपक्ष्यांसाठी केली पाण्याची व्यवस्था

पशुपक्ष्यांसाठी केली पाण्याची व्यवस्था

वणी : उन्हाचा तडाखा व
पाण्याची टंचाईचा सामना केवळ मानवी जीवच करीत नाही तर पशुपक्ष्यांनाही याची तीव्रता जाणवते. पशुपक्ष्यांसाठी भातोडे येथील ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याची सोय पाणवठ्याच्या माध्यमातून करून पशुपक्ष्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत भूतदया जोपासली आहे.
साताशिखरातील पर्वत रांगांमधील मार्कंडेय पर्वताच्या पायथ्याशी भातोडे गाव असून, उन्हाळ्यात पाण्याच्या तीव्रतेचा सामना या गावालाही करावा लागतो. हातपंप व शेतजमिनीतील विहिरीतून पाण्याची गरज भागविली जाते. दरम्यान, अशाच पद्धतीच्या पाणीटंचाईचा सामना पशुपक्ष्यांनाही करावा लागतो. त्यात जशीजशी उन्हाची तीव्रता वाढते तसतसे वन्यजीव पाण्याच्या शोधार्थ पर्वतरांगातून व जंगली भागातून भटकंती करत मानवी वस्त्यांपर्यंत येऊन पोहचतात. यामुळे भीतीचे वातावरण अशा स्थितीत निर्माण होते. या सगळ्या बाबी विचारात घेऊन गावापासून दोन किलोमीटर अंतरावर २० बाय १०अंतराचा व १ फूट खोल खड्डा श्रमदानाने तयार करून सुमारे तीनशे मीटर अंतरावरील पवारवस्तीतून विद्युत पंपाद्वारे यात पाणी सोडण्यात येते. सुमारे तीन हजार लिटर इतकी क्षमता या पाणवठ्याची आहे.
विहिरीने तळ गाठण्यास प्रारंभ केल्याने शेती सांभाळून पाइपलाइनद्वारे पाणी या ठिकाणी पोहचविणे काही दिवसात जिकिरीचे ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत प्राप्त होत आहेत तरीही वन्यजीव पशुपक्षी यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करणाऱ्या भातोडा ग्रामस्थांचा उपक्रम स्तुत्य असाच आहे. (वार्ताहर)

Web Title: Settlement arrangements for livestock