शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
4
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
5
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
6
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
7
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
8
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
9
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
10
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
11
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
12
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
13
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
14
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
15
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
16
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
17
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
18
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
19
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
20
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव महापालिकेच्या स्वच्छतापत्रकात गंभीर चुका

By admin | Updated: October 28, 2014 00:23 IST

दुर्लक्ष : आरोग्य विभागाकडून मराठीची ऐशीतैशी

मालेगाव कॅम्प : मालेगाव महानगरपालिकेतर्फे छापण्यात आलेल्या साफसफाईबाबतच्या आवाहन पत्रकात असंख्य चुका असून, या पत्रकाच्या शीर्षकातच ‘नागरिक’ऐवजी ‘पागरीक’ असे छापण्यात आले आहे. अनेक गंभीर चुका करूनही मनपाच्या संबंधित कर्मचाऱ्यांनी मुद्रणदोष सांगत जबाबदारी टाळली आहे.शहरात महानगरपालिकेतर्फे डेंग्यूसद्श किटकजन्य रोगप्रतिबंधक उपाययोजनेसंदर्भात नागरिकांनी घ्यावयाच्या काळजीबाबतचे पत्रके घरोघरी पोहोचले; परंतु या मराठी भाषेतील पत्रकात मराठी भाषेची ऐशीतैशी केली आहे. पत्रकातील मोठ्या अक्षरातील शीर्षकामध्ये ‘नागरिकांना’ जाहीर आवाहन या ऐवजी ‘पागरीकांना’ असे म्हटले आहे. त्याचपाठोपाठ इतर मुद्द्यांमध्ये ‘रोग नियंत्रणासाठी’ याऐवजी ‘नियंत्रणासाणी’ तर ‘काळजी’च्या जागेवर ‘काघजी’, ‘अगरबत्ती’ या शब्दाचे रूपांतर ‘अगरपत्ती’ असे केले. ‘कर्मचारी’ शब्दाचे ‘कर्मजारी’ असे केले तर ‘साधावाचे’ ‘साझवा’, पाणीसाठेचे काणीसाठे व ‘भांडे’ऐवजी ‘भंड्या’ असे मिश्कील नावे टाकून शहरवासीयांची करमणूकच केली आहे.शहरात दिवाळीच्या दिवसांमध्ये विविध वृत्तपत्रांमध्ये ही पत्रके टाकण्यात येऊन घरोघरी पोहोचली; परंतु पत्रके वाचल्यानंतर अनेकांची करमणूकच झाली. ऐन सणाच्या दिवसात शुभेच्छा संदेशासोबत महापालिकेच्या पत्रकांचा फोटो भ्रमणध्वनी, व्हॉट्सअ‍ॅप व फेसबुकवर टाकले व महापालिकेचा कर्तव्यदक्षपणा नागरिकांना नजरेत आणून दिला. ही पत्रके ज्या ठिकाणी छपाई करण्यात आली तेथे साधी मराठी शब्दांचे मुद्रणशोधन (प्रूफरिडिंग) झाली नसल्याचे दिसून आले. (वार्ताहर)