शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
6
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
7
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
8
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
9
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
10
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
11
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
12
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
13
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
14
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
15
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
16
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
17
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
18
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
19
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
20
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

.स्थायी समितीवर आठ सदस्यांची निवड

By admin | Updated: February 27, 2015 23:33 IST

विशेष सभा : मनसे-राष्ट्रवादीत अखेरपर्यंत चुरस

नाशिक : महापालिकेची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीवरील निवृत्त झालेल्या आठ सदस्यांच्या रिक्त जागांसाठी विशेष सभेत निवड प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात मनसेच्या चार, राष्ट्रवादीच्या तीन आणि कॉँग्रेसच्या एका सदस्याची निवड महापौर अशोक मुर्तडक यांनी घोषित केली. इच्छुकांची संख्या पाहता मनसे आणि राष्ट्रवादीत सभा सुरू होईपर्यंत चुरस दिसून आली. महापालिकेच्या स्थायी समितीचे विद्यमान सभापती मनसेचे राहुल ढिकले यांच्यासह शीतल भामरे, अर्चना थोरात आणि दीपाली कुलकर्णी, राष्ट्रवादीचे राजेंद्र महाले, शोभा आवारे आणि रूपाली गावंड तसेच कॉँग्रेसचे शिवाजी गांगुर्डे हे आठ सदस्य शनिवारी (दि.२८) निवृत्त होत आहेत. त्यापूर्वीच शुक्रवारी बोलाविलेल्या विशेष सभेत रिक्त होणाऱ्या आठ जागांवर नव्या सदस्यांची निवड प्रक्रिया राबविण्यात आली. विशेष सभेला सुरुवात होण्यापूर्वी गटनेत्यांनी नियुक्त होणाऱ्या सदस्यांची नावे महापौरांकडे सादर केली. त्यानुसार स्थायी समितीवर मनसेचे अनिल मटाले, यशवंत निकुळे, संगीता गायकवाड आणि रत्नमाला राणे, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शिवाजी चुंभळे, नीलिमा आमले आणि छाया ठाकरे, तर कॉँग्रेसच्या विमल पाटील यांची निवड करण्यात आल्याचे महापौरांनी घोषित केले. यावेळी महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते निवड झालेल्या सदस्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. स्थायी समितीवर जाण्यासाठी सत्ताधारी मनसेसह राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसमध्ये कमालीची चुरस दिसून आली. मनसेमध्ये रुची कुंभारकर, गणेश चव्हाण, कांचन पाटील, मेधा साळवे, सुरेखा भोसले व उषा शेळके यांच्याही नावाची चर्चा होती. विभागनिहाय स्थायीवर प्रतिनिधित्व देण्याचीही मनसेत चर्चा सुरू होती, परंतु पूर्व, सिडको आणि नाशिकरोड भागालाच प्रतिनिधित्व मिळाले. त्यामुळे इच्छुक सदस्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून आला. राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्येही शेवटपर्यंत चुरस दिसून आली. राष्ट्रवादीकडून समाधान जाधव, संजय साबळे यांच्याही नावाची चर्चा होती, परंतु ऐनवेळी त्यांचा पत्ता कापण्यात आला आणि नीलिमा आमले व छाया ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. कॉँग्रेसकडून वत्सला खैरे, योगीता अहेर यांचीही नावे आघाडीवर होती, परंतु विमल पाटील यांनी बाजी मारली. (प्रतिनिधी)