.स्थायी समितीवर आठ सदस्यांची निवड

By Admin | Updated: February 27, 2015 23:33 IST2015-02-27T23:33:37+5:302015-02-27T23:33:55+5:30

विशेष सभा : मनसे-राष्ट्रवादीत अखेरपर्यंत चुरस

Selection of eight members on the permanent committee | .स्थायी समितीवर आठ सदस्यांची निवड

.स्थायी समितीवर आठ सदस्यांची निवड

नाशिक : महापालिकेची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीवरील निवृत्त झालेल्या आठ सदस्यांच्या रिक्त जागांसाठी विशेष सभेत निवड प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात मनसेच्या चार, राष्ट्रवादीच्या तीन आणि कॉँग्रेसच्या एका सदस्याची निवड महापौर अशोक मुर्तडक यांनी घोषित केली. इच्छुकांची संख्या पाहता मनसे आणि राष्ट्रवादीत सभा सुरू होईपर्यंत चुरस दिसून आली.
महापालिकेच्या स्थायी समितीचे विद्यमान सभापती मनसेचे राहुल ढिकले यांच्यासह शीतल भामरे, अर्चना थोरात आणि दीपाली कुलकर्णी, राष्ट्रवादीचे राजेंद्र महाले, शोभा आवारे आणि रूपाली गावंड तसेच कॉँग्रेसचे शिवाजी गांगुर्डे हे आठ सदस्य शनिवारी (दि.२८) निवृत्त होत आहेत. त्यापूर्वीच शुक्रवारी बोलाविलेल्या विशेष सभेत रिक्त होणाऱ्या आठ जागांवर नव्या सदस्यांची निवड प्रक्रिया राबविण्यात आली. विशेष सभेला सुरुवात होण्यापूर्वी गटनेत्यांनी नियुक्त होणाऱ्या सदस्यांची नावे महापौरांकडे सादर केली. त्यानुसार स्थायी समितीवर मनसेचे अनिल मटाले, यशवंत निकुळे, संगीता गायकवाड आणि रत्नमाला राणे, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शिवाजी चुंभळे, नीलिमा आमले आणि छाया ठाकरे, तर कॉँग्रेसच्या विमल पाटील यांची निवड करण्यात आल्याचे महापौरांनी घोषित केले. यावेळी महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते निवड झालेल्या सदस्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. स्थायी समितीवर जाण्यासाठी सत्ताधारी मनसेसह राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसमध्ये कमालीची चुरस दिसून आली. मनसेमध्ये रुची कुंभारकर, गणेश चव्हाण, कांचन पाटील, मेधा साळवे, सुरेखा भोसले व उषा शेळके यांच्याही नावाची चर्चा होती. विभागनिहाय स्थायीवर प्रतिनिधित्व देण्याचीही मनसेत चर्चा सुरू होती, परंतु पूर्व, सिडको आणि नाशिकरोड भागालाच प्रतिनिधित्व मिळाले. त्यामुळे इच्छुक सदस्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून आला. राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्येही शेवटपर्यंत चुरस दिसून आली. राष्ट्रवादीकडून समाधान जाधव, संजय साबळे यांच्याही नावाची चर्चा होती, परंतु ऐनवेळी त्यांचा पत्ता कापण्यात आला आणि नीलिमा आमले व छाया ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. कॉँग्रेसकडून वत्सला खैरे, योगीता अहेर यांचीही नावे आघाडीवर होती, परंतु विमल पाटील यांनी बाजी मारली. (प्रतिनिधी)

Web Title: Selection of eight members on the permanent committee