शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा रक्षक महिनाभरासाठीच!

By admin | Updated: April 27, 2017 01:36 IST

नाशिक :प्रदूषण रोखण्यासाठी ६० सुरक्षा रक्षकांची नियुक्ती आयुक्तांनी आपल्या अधिकारात केली त्यांना मुदतवाढ मिळण्यासाठी प्रशासनाला स्थायीचे दरवाजे ठोठावे लागणार आहे.

नाशिक : महापालिकेने गोदावरी नदीपात्रातील प्रदूषण रोखण्यासाठी सुमारे ६० सुरक्षा रक्षकांची नियुक्ती आयुक्तांनी आपल्या अधिकारात दोन महिन्यांच्या कालावधीसाठी केली खरी परंतु आता महिनाभरानंतर त्यांना मुदतवाढ मिळण्यासाठी व मानधनावर नियुक्तीसाठी प्रशासनाला स्थायी समितीचे दरवाजे ठोठावे लागणार आहे. एरवी मानधनावर कर्मचारी नियुक्तीसाठी खळखळ करणाऱ्या प्रशासनाची या प्रस्तावाच्या निमित्ताने स्थायीकडून अडवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.गोदावरी प्रदूषणाबाबत न्यायालयाने महापालिकेला वारंवार फटकारल्यानंतर आयुक्तांनी गोदावरी कक्षाची स्थापना केली असून, स्वतंत्र उपआयुक्त नेमून त्यादृष्टीने कामकाजही सुरू केले आहे. गोदावरी कक्षाचा कार्यभार उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. गोदावरी कक्षामार्फत १ एप्रिलपासून गोदावरी घाटावर गांधीतलावापासून ते टाळकुटेश्वर पुलापर्यंत ६० सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. सदर सुरक्षा रक्षक तीन सत्रात गोदाघाटावर पहारा देत असतात. गोदापात्रात घाण व कचरा टाकणाऱ्यांकडून तातडीने हजार रुपये दंडाची वसुली केली जात असते शिवाय नागरिकांच्या प्रबोधनाचीही भूमिका ते पार पाडत आहेत. महापालिका आयुक्तांनी सदर सुरक्षा रक्षकांची नियुक्ती ही आयुक्तांनी कलम ७३ ड नुसार त्यांना असलेल्या अधिकारात केलेली आहे. त्यासाठी १६ लाख ५२ हजार ६४० रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. सदर नियुक्ती ही दोन महिन्यांच्या कालावधीसाठीच आहे. आता एप्रिल महिना संपत चालला आहे. त्यामुळे ३१ मे पर्यंत सदर सुरक्षा रक्षकांची नियुक्ती असणार आहे. त्यानंतर सदर सुरक्षा रक्षकांच्या नियुक्तीचा प्रश्न प्रशासनापुढे निर्माण होणार आहे. त्यासाठी सध्या कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांनाच पुढे सहा महिन्यांसाठी मानधनावर मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून तयार केला जात असून, त्यासाठी स्थायी समितीची मान्यता आवश्यक आहे. स्थायी समितीला आपल्या अधिकारात सहा महिन्यांसाठी मानधनावर कर्मचारी नियुक्त करता येतात. परंतु, यापूर्वी मानधनावरील नियुक्तीचा प्रश्न जेव्हा कधी स्थायीवर चर्चेला आला त्यावेळी प्रशासनाने नाना कारणे दिली आहेत. त्यामुळे सुरक्षा रक्षकांचा मानधनाचा प्रस्ताव आलाच तर स्थायीकडून त्याबाबत अडवणूक होण्याची अथवा नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांना संधी देण्याची मागणी केली जाऊ शकते. (प्रतिनिधी)