शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
2
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानांचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
3
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
4
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
5
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
6
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
7
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
8
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
9
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
10
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?
11
Google करणार Flipkart सोबत काम, डील जाहीर; आता मंजुरीची प्रतीक्षा
12
Dostana 2: करण जोहर-कार्तिक आर्यनच्या मतभेदामुळे रखडला 'दोस्ताना २'?, जान्हवी कपूरचा खुलासा
13
हरियाणातील आमदार  राकेश दौलताबाद यांचं निधन, सकाळी आला होता हृदयविकाराचा झटका 
14
"एलईडीच्या जमान्यात कंदील घेऊन फिरतायेत, तेही एकच घर उजळण्यासाठी…", नरेंद्र मोदींचा लालूंवर निशाणा
15
बंपर रिटर्न! SBI ची ही स्किम ४०० दिवसांच्या FD वर ७.६०% पर्यंत व्याज देणार
16
"तुम्ही तुमचे बघा, हस्तक्षेप खपवून घेणार नाही"; केजरीवालांनी पाकिस्तानी नेत्याला दाखवला आरसा
17
स्मिता पाटील यांना झाला होता आभास, मध्यरात्री २ वाजता अमिताभ बच्चन...काय आहे तो किस्सा?
18
"मी आणि मिताली राज आम्ही दोघे...", Shikhar Dhawan चा मोठा खुलासा, म्हणाला...
19
"कोणताच मार्ग नव्हता, जीव वाचवण्यासाठी..."; 8 महिन्यांच्या गर्भवतीने 20 फुटांवरुन मारली उडी अन्...
20
VIDEO: भररस्त्यात गँगवॉर! शस्त्राने वार करत एकमेकांच्या अंगावर घातल्या गाड्या

सलग दुसऱ्या वर्षी ईदगाह मैदान राहणार सुनेसुने; बकरी ईद साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 2:43 PM

पवित्र हज यात्राही सौदी अरेबिया सरकारकडून कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता रद्द करण्यात आली. हज यात्रा रद्द होण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे. बकरी ईद आणि हज यात्रा हे पारंपरिक धार्मिक समीकरण आहे. यंदा हज यात्रा रद्द झाल्याने समाजबांधवांचा हिरमोड झाला आहे.

ठळक मुद्देदाऊदी बोहरा बांधवांकडुन ईद साजरीप्रवचन यु-ट्युबवरुन लाइव्ह करण्यात आले. सोशलमिडियाद्वारे संदेश पाठवून शुभेच्छा घरांमध्ये नमाज अदा करण्यास प्राधान्य दिले जाणार

नाशिक : रमजान ईदप्रमाणे बुधवारी (दि.२१) साजऱ्या होणाऱ्या ह्यईद-उल-अज्हाह्ण अर्थात बकरी ईदवरदेखी कोरोनाचे सावट असल्याने ऐतिहासिक ईदगाह मैदानावर होणारा सामुहिक विशेष नमाजपठणाचा सोहळा शासनाच्या आदेशान्वये रद्द करण्यात आल्याचे शहर-ए-खतीब हाफीज हिसामुद्दीन अशरफी यांनी जाहीर केले आहे. यामुळे यंदा सलग दुसऱ्या वर्षी ईदगाह मैदान सुनेसुने राहणार आहे. दोन महिन्यांपुर्वी साजरी झालेल्या रमजान ईदचेही सामुहिक नमाजपठण ईदगाह मैदानावर करण्यात आले नव्हते.

शहरासह जिल्ह्यात सर्वत्र साधेपणाने साजरी करण्यात येणार आहे. बुधवारी साजरी होणाऱ्या ईदनिमित्ताने मुस्लीम बांधवांकडून घरांमध्ये नमाज अदा करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. मशिदींमध्येसुध्दा प्रमुख मौलवींसह काही मोजक्याच लोकांना ईदचे नमाजपठण करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे मशिदींमध्ये गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन सर्व मशिदींच्या विश्वस्तांना पोलीस व जिल्हा प्रशासनाने केले आहे.सालाबादप्रमाणे यावर्षीही बकरी ईदचा सण पारंपरिक पध्दतीने साजरा करण्यात येणार आहे. यासाठी समाजबांधवांची तयारी पुर्ण झाली आहे. शासन, प्रशासनाच्या आदेशाचे पालन करत कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता बकरी ईद साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी ईदच्या पार्श्वभुमीवर पार पडणारी पवित्र हज यात्राही सौदी अरेबिया सरकारकडून कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता रद्द करण्यात आली. हज यात्रा रद्द होण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे. बकरी ईद आणि हज यात्रा हे पारंपरिक धार्मिक समीकरण आहे. यंदा हज यात्रा रद्द झाल्याने समाजबांधवांचा हिरमोड झाला आहे.यंदा कोरोनामुळे बोकडांचा बाजारातही तेजी आलेली पहावयास मिळत आहे. बोकडांचा भावही वाढला आहे.दाऊदी बोहरा बांधवांकडुन ईद साजरीशहरातील दाऊदी बोहरा समाजबांधवांकडून नुकतीच बकरी ईद साजरी करण्यात आली. यावेळी टाकळीफाटा येथील कुतुबी मशिदीतून धर्मगुरु मुस्तुफा रशीद शेख यांचे प्रवचन यु-ट्युबवरुन लाइव्ह करण्यात आले. मशिदीमध्ये मोजक्याच प्रमुख विश्वस्तांकडून नमाजपठण करण्यात आले. नागरिकांनी आपआपल्या घरांमध्ये ईदची नमाज अदा केली. दरम्यान, एकमेकांना फोनवरुन तसेच सोशलमिडियाद्वारे संदेश पाठवून शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :Bakri Eidबकरी ईदNashikनाशिकShajahaani Eidgahशाहजहांनी इदगाहMuslimमुस्लीम