शहरं
Join us  
Trending Stories
1
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
2
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
4
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
5
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
6
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
7
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
8
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
9
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
10
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
11
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
12
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
13
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
14
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
15
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
16
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
17
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
18
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
19
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
20
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 

सोशल मिडियावर दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची अफवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 7:00 PM

सध्या दहावी व बारावीचे विद्यार्थी परीक्षा देत असून, ते परीक्षेच्या तणावाचा सामना करीत असताना सोशल मीडियावर विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करणारे मेसेज व्हायरल होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत आहे. सध्या विशेष योजनांद्वारे 50 ते 60 टक्के गुणवत्ता मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती दिली जात असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने विद्यार्थ्यांच्या मन:स्थितीवर परिणाम होऊन त्यांच्या गुणवत्तेवरही परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देसोशल मिडियावर शिष्यवृत्तीसंदर्भात अफवा परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम शिष्यवृत्ती योजनेलेला जोडले कलाम, वाजपेयी यांचे नाव

नाशिक : सध्या दहावी व बारावीचे विद्यार्थी परीक्षा देत असून, ते परीक्षेच्या तणावाचा सामना करीत असताना सोशल मीडियावर विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करणारे मेसेज व्हायरल होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत आहे. सध्या विशेष योजनांद्वारे 50 ते 60 टक्के गुणवत्ता मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती दिली जात असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने विद्यार्थ्यांच्या मन:स्थितीवर परिणाम होऊन त्यांच्या गुणवत्तेवरही परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला असताना शिक्षण विभागाने मात्र याकडे आत्तार्पयत काणाडोळा केला आहे. दहावी आणि बारावीची बोर्डाची परीक्षा अंतिम टप्प्यात आलेली असताना सोशल मीडियावर शिष्यवृत्तीसंदर्भात भुवया उंचावण्यास भाग पाडणारा एकच मॅसेज फिरू लागला आहे. शासनाने भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने शिष्यवृत्ती योजना सुरू केली असून, या योजनेंतर्गत दहावीच्या ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत 50 टक्के अथवा त्याहून अधिक गुण मिळविले आहे त्यांना 11 हजार रुपये व ज्यांनी बारावीच्या परीक्षेत 60 टक्के व त्याहून अधिक गुण मिळवले आहे, अशा विद्यार्थ्यांना 20 हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार असल्याची अफवा पसरवली जात असून, यासाठी संबंधित महापालिका अथवा नगरपालिका कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन या मेसेजद्वारे करण्यात आले आहे. मात्र अशी कोणतीही शिष्यवृत्ती सरकारकडून जाहीर झाली नसल्याची माहिती वजा स्पष्टीकरण खुद्द शिक्षण खात्याकडून देण्यात आले आहे. बारावी व दहावीची परीक्षा सुरू असताना सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या पोस्टमध्ये तथ्य नसल्याचे नाशिक महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी नितीन उपासनी यांनी स्पष्ट केले असून यासंबंधीचे अधिकृत पत्र काढून विद्यार्थ्यांमधील गैरसमज दूर कऱणार अशल्याचे त्यांनी सांगितले आहे.

अफवांची शहनिशा गरणे गरजेचेदहावी व बारावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या करिअरची दिशा ठरविणारी आहे. त्यामुळे या परीक्षेचा विद्याथ्र्यावर मोठय़ा प्रमाणात तणाव असताना विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या अशा व्हायरल पोस्ट समाजहितासाठी धोकादायक ठरणाऱ्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी कोणत्याही मेसेजवर सहज विश्वास न ठेवता त्यांची शहानिशा करणे आवश्यक झाले आहे.  

पोस्टमध्ये तथ्य नाहीसोशल मीडियावर माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने शिष्यवृत्तीविषयी फिरणाऱ्या पोस्ट चुकीच्या असून, अशाप्रकारची कोणतीही योजना सध्या सुरू नाही. त्यामुळे विद्याथ्र्यानी व त्यांच्या पालकांनी अशा पोस्टवर विश्वास ठेवू नये.- नितीन उपासनी, शिक्षणाधिकारी, नाशिक महानगरपालिका नाशिक

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाNashikनाशिकStudentविद्यार्थीexamपरीक्षा