शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिक, सामाजिक विषयांवरील देखावे

By admin | Updated: September 12, 2016 01:18 IST

सातपूर गणेशोत्सव : ‘सातपूरचा राजा’चे आकर्षण

सातपूर : परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी धार्मिक, सामाजिक, पौराणिक यांसह विविध देखावे सादर केलेले आहेत. देखावे पाहण्यासाठी गणेशभक्तांची गर्दी होत असून, सातपूर कॉलनीतील ‘सातपूरचा राजा’ने गणेशभक्तांना विशेष आकर्षित केले आहे. शनिवार आणि रविवार या सुटीच्या दिवसांचे औचित्य साधत गणेशभक्तांनी देखावे पाहण्यासाठी गर्दी केली आहे. यावर्षी गणेशोत्सव मंडळांनी आकर्षक देखावे सादर केलेले आहेत. सातपूर गावातील अमरज्योत मित्रमंडळाचे हे २३ वे वर्ष आहे. दरवर्षी सामाजिक जिवंत देखावे सादर करणे ही या मंडळाची ख्याती आहे. यावर्षी ‘स्त्रीभ्रूण हत्त्या’ या विषयावर जिवंत देखावा सादर केला आहे. मंडळाचे संस्थापक विजय भंदुरे, तसेच चेतन भंदुरे, मच्छिन्द्र भंदुरे, भास्कर मौले, गिरीश गोवर्धने, सुरेश विधाते, किसन शेवकर, गोरक्ष सोनवणे, संजय भंदुरे आदि कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. सातपूर कॉलनीतील ओमसाईराम मित्रमंडळाने ‘लालबागचा राजा’प्रमाणे सातपूरचा राजा हा भव्य देखावा सादर केला आहे. १५ फूट उंचीची भव्य गणेशमूर्ती आणि राजवाडा असा देखावा सादर केला आहे. हा भव्यदिव्य देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे. मंडळाच्या वतीने विविध स्पर्धा आणि सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेश खताळे आणि त्यांचे सहकारी प्रयत्नशील आहेत. अशोकनगर येथील राज्य कर्मचारी तरुण मित्रमंडळाचे हे २२ वे वर्ष आहे. मंडळाने यावर्षी सावित्री नदीवरील दुर्घटनेवर आधारित ‘दुर्घटना नैसर्गिक की मानवी’ हा सामाजिक देखावा सादर केला आहे. त्याचप्रमाणे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाचे संस्थापक नरेश सोनवणे यांच्यासह संतोष शेळके, सुनील बोडके, योगेश आहेर, आशिष भदाणे आदि कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. (वार्ताहर)