सायली, तनिशा, कुशलची महाराष्ट्राच्या संघात निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:16 IST2021-02-25T04:16:56+5:302021-02-25T04:16:56+5:30

नाशिक : मुंबईत झालेल्या राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेनंतर राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची निवड करण्यात आली. नाशिकच्या सायली वाणी ...

Sayali, Tanisha, Kushal selected in Maharashtra team | सायली, तनिशा, कुशलची महाराष्ट्राच्या संघात निवड

सायली, तनिशा, कुशलची महाराष्ट्राच्या संघात निवड

नाशिक : मुंबईत झालेल्या राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेनंतर राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची निवड करण्यात आली. नाशिकच्या सायली वाणी व तनिशा कोटेचा यांची सब ज्युनियर, ज्युनियर तसेच युथ गट अशा तिन्ही मुलींच्या गटात राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली असून या तिन्ही गटांचे प्रतिनिधित्व महाराष्ट्राकडून राष्ट्रीय स्पर्धेत करण्याची संधी या दोघींना मिळाली आहे. तर कुशल चोपडाची सब ज्युनियर व ज्युनियर मुले अशा मुलांच्या दोन गटात निवड झाली. एका वेळेस तीन गटात निवड होणाऱ्या सायली व तनिशा या नाशिक जिल्ह्यातील पहिल्या दोन खेळाडू आहेत. तसेच नाशिकचे जय मोडक यांची कॅडेट आणि सब ज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाराष्ट्राच्या संघाच्या प्रशिक्षक म्हणून निवड झाली. या वर्षीच्या कॅडेट व सब ज्युनियर मुले व मुलींच्या राष्ट्रीय स्पर्धा या इंदोर येथे होणार आहेत. त्यांच्या या यशाबद्दल जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी या सर्व खेळाडूंचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड संघटनेचे सचिव शेखर भंडारी, राजेश भरवीरकर, अभिषेक छाजेड, मिलिंद कचोळे या प्रसंगी उपस्थित होते.

फोटो

२४ टेबल टेनिस

Web Title: Sayali, Tanisha, Kushal selected in Maharashtra team