केबीएच विद्यालयात संत गाडगेबाबा जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:15 IST2021-02-24T04:15:08+5:302021-02-24T04:15:08+5:30

अध्यक्षस्थानी प्राचार्य अनिल पवार होते. यावेळी उपप्राचार्य विलास पगार, पर्यवेक्षक प्रवीण पाटील, निवृत्ती निकम, संजीव महाले, कार्यालयीन प्रमुख ...

Sant Gadge Baba Jayanti celebration at KBH Vidyalaya | केबीएच विद्यालयात संत गाडगेबाबा जयंती साजरी

केबीएच विद्यालयात संत गाडगेबाबा जयंती साजरी

अध्यक्षस्थानी प्राचार्य अनिल पवार होते. यावेळी उपप्राचार्य विलास पगार, पर्यवेक्षक प्रवीण पाटील, निवृत्ती निकम, संजीव महाले, कार्यालयीन प्रमुख जे. एस. कन्नोर, संजय सूर्यवंशी, ज्येष्ठ शिक्षक एम. आर. अहिरे, व्याख्याते अनिल वाघ, बी. एन. सोनवणे, एस. के. सूर्यवंशी व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

शिक्षक अनिल वाघ यांनी संत गाडगेबाबा यांच्या कार्याची माहिती दिली. प्राचार्य पवार यांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. सूत्रसंचालन राजेंद्र शेवाळे यांनी केले. राजेश धनवट यांनी आभार मानले. यावेळी सचिन लिंगायत, जी. यु. कोकरे, जयदीप शेवाळे, टी. यु. देवरे, आंनद भालेराव, जे. टी. ठाकरे, एस. डी. महाले व शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Sant Gadge Baba Jayanti celebration at KBH Vidyalaya