संग्राम गोविंदा पथकाने फोडली दहीहंडी

By Admin | Updated: August 26, 2016 00:03 IST2016-08-26T00:03:33+5:302016-08-26T00:03:49+5:30

संग्राम गोविंदा पथकाने फोडली दहीहंडी

Sangram Govinda squad kicks off | संग्राम गोविंदा पथकाने फोडली दहीहंडी

संग्राम गोविंदा पथकाने फोडली दहीहंडी

 इगतपुरी : इगतपुरी शहराजवळ असलेल्या टिटोली या एक हजार लोकवस्तीच्या गावातील जिद्दी युवकांनी येथील दहीहंडी फोडण्याचा मान मिळविला.
पाच वर्षांपूर्वी श्री संग्राम गोविंदा पथक स्थापन झाले. सुमारे अडीचशे ते तीनशे युवकांचा या पथकात समावेश असून, दहीहंडी फोडण्याचा ते केवळ महिनाभर सराव करतात.
या कार्यक्र मात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सिनेअभिनेता स्वप्नील रेडकर हे या दहीहंडीचे मुख्य आकर्षण ठरले.
यावेळी शिवसैनिक अशोक गुंबाडे, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर लहाने, गोरख बोडके, काशीनाथ मेंगाळ, संदीप गुळवे, पोलीस निरीक्षक संजय शुक्ला, कावजी ठाकरे, सरपंच हरीश चव्हाण, कैलास भगत, विलास जोशी, कैलास कडू, दत्ता तोकडे, सखाराम जोशी, अरु ण भागडे, नंदलाल भागडे, श्री संग्राम गोविंदा पथकाचे अध्यक्ष किशोर गतीर, विठ्ठल लंगडे, संपत डावखर, युवा आगरी सेनेचे उपजिल्हाध्यक्ष अनिल भोपे, टिटोली उपसरपंच दौलत बोंडे आदि उपस्थित होते.
सूत्रसंचालन उत्तम गायकर व अनिल भोपे यांनी केले, तर मंडळाचे अध्यक्ष किशोर
गतीर यांनी आभार मानले. (वार्ताहर )

Web Title: Sangram Govinda squad kicks off