शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

संभाजी विकास सोसायटी निवडणूक; बारा जागांकरिता ४७ उमेदवारी अर्ज

By admin | Updated: October 13, 2015 22:07 IST

दोन पॅनलमध्ये लढत : लोकशाही विकास, शेतकरी विकासची निर्मिती

नवी बेज : कळवण तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या संभाजी विविध कार्यकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत बिनविरोध निवडीची चर्चा निष्फळ ठरली असून, लोकशाही विकास पॅनल व शेतकरी विकास पॅनलची निर्मिती होऊन निवडणुकीत चांगलीच रंगत निर्माण झाली आहे.नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी धनंजय पवार यांच्या उमेदवारीचा ठराव याच विविध कार्यकारी सोसायटीमधून होत असल्याने या सोसायटीच्या निवडणुकीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. यावेळी निर्माण झालेल्या शेतकरी विकास पॅनलमध्ये चिंधा खैरनार, विनोद खैरनार, दीपक खैरनार, माणिक देवरे, नितीन निकुंभ, मधुकर वाघ, निंबा वाघ, विश्वनाथ अहिरराव, महिला राखीव- मखबलाबाई खैरनार, साखरबाई बच्छाव, इतर मागासवर्गीय- चंद्रकांत पवार, अनु. जाती-जमाती गटातून मधुकर गांगुर्डे यांचा समावेश आहे, तर लोकशाही विकास पॅनलमध्ये जनरल गटात यादवराव पवार, अ‍ॅड. भाऊसाहेब पवार, योगेश खैरनार, योगेश वाघ, पोपट खैरनार, निंबा दोधू, केशव बोरसे, केदा जगताप, महिला राखीव गटातून रंजनाबाई पवार, रेखाबाई गांगुर्डे, इतर मागासवर्गीय- गोरख खैरनार, अनु. जाती-जमाती- दामू गांगुर्डे यांचा समावेश असून, भटक्या विमुक्त जाती-जमाती गटाच्या जागा निरंक आहेत. सत्ताधारी शेतकरी विकास पॅनलचे नेतृत्व जिल्हा बँक संचालक धनंजय पवार करीत आहेत, तर लोकशाही विकास पॅनलचे नेतृत्व माजी सरपंच अशोक पवार, अ‍ॅड. भाऊसाहेब पवार, माजी वसाका संचालक बाजीराव पवार, कॉ. शिवाजी वळीकर, कॉ. निंबा पगारे, मधुकर वाघ, प्रवीण गांगुर्डे आदि करीत आहेत. विरोधी पॅनल तयारच होऊ शकत नाही अशी चर्चा असताना, एक तुल्यबळ पॅनल तयार झाल्याने निवडणूक चुरशीची होणार हे स्पष्ट आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सतीश देवघरे, सहायक म्हणून रामदास बहिरम काम पाहत आहेत. (वार्ताहर)