शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

जनता कर्फ्यूत अडकला सलून व्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 02:01 IST

देवळा : शहरातील सलून व्यावसायिकांची दुकाने २२ मार्चपासून लॉकडाऊननंतर आजपर्यंत बंदच असल्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कोरोनामुळे देवळा शहरात १३ जुलैपर्यंत असलेला जनता कर्फ्यू संपण्याची प्रतीक्षा आता शहरातील ३५ सलून व्यवसायिक करीत आहेत.

देवळा : शहरातील सलून व्यावसायिकांची दुकाने २२ मार्चपासून लॉकडाऊननंतर आजपर्यंत बंदच असल्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कोरोनामुळे देवळा शहरात १३ जुलैपर्यंत असलेला जनता कर्फ्यू संपण्याची प्रतीक्षा आता शहरातील ३५ सलून व्यवसायिक करीत आहेत.देशात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. त्याचा सर्व छोट्या-मोठ्या उद्योग व्यवसायांना आर्थिक फटका बसला. देवळा शहरातील सर्व सलूनची दुकाने चार महिन्यांपासून बंदच आहेत. लॉकडाऊन उठल्यानंतर इतर दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली. परंतु सलून व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायातून कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका सर्वाधिक असल्याचे कारण देऊन त्यांना दुकाने उघडण्यास परवानगी दिली जात नाही. यामुळे सलून चालकांना कठीण परिस्थितीतून जावे लागत आहे. बहुतेक सलून चालकांना शेती वा दुसरे उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे त्यांचे सर्व कुटुंबाचा उदरनिर्वाह दुकानावर अवलंबून आहे. परंतु दुकान बंद असल्यामुळे आर्थिक आवक बंद झाल्यामुळे त्यांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. काही कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली.-----------------..अन् दुकानेउघडलीच नाहीत !२८ जूनपासून शहरातील सलून-चालकांना देवळा नगरपंचायतीने कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करून दुकाने उघडण्यास परवानगी दिली होती. परंतु दुर्दैवाने देवळा शहरात २८ जून रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यामुळे जनता कर्फ्यू घोषित झाला व दुकाने बंदच राहिली. शहरातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली व ४ जुलैपर्यंत रु ग्णांची संख्या १८ झाली. परंतु त्यानंतर मात्र शहरात आतापर्यंत एकही पॉझिटिव्ह रु ग्ण आढळून आला नाही. यामुळे १३ जुलैपर्यंत असलेल्या जनता कर्फ्यूनंतर दुकाने उघडण्याची प्रतीक्षा शहरातील सलून व्यावसायिक करीत आहेत.-----------दुकान बंद असल्यामुळे दैनंदिन खर्च, व्यवसायासाठी घेतलेले कर्ज कसे फेडावे ह्या चिंतेत आहे. शहरातील ज्या भागात कोरानाचे रुग्ण सापडतील तो भाग सील करावा व उर्वरित शहरात दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी. दुकान उघडल्यानंतर शासनाने निर्देशित केलेल्या कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करू.- हेमराज पगार, सलून व्यावसायिक, देवळा

टॅग्स :Nashikनाशिक