शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
3
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
4
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
5
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
6
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
7
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
8
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
9
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
10
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
11
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
12
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
13
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
14
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
15
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
16
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
17
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
18
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
19
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
20
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई

शहरात दिवसभर संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 12:24 AM

नाशिक : मागील दीड महिन्यांपासून नाशिककरांना पावसाच्या समाधानकारक वर्षावाची प्रतीक्षा होती. गेल्या बुधवारी पावसाचे जोरदार ‘कमबॅक’ झाल्यानंतर पुन्हा गती मंदावली होती. शुक्रवारपर्यंत रिपरिप सुरूच होती; मात्र शनिवारी संध्याकाळपासून पावसाचा जोर शहरासह जिल्ह्यात वाढल्याने गंगापूर धरणाचा जलसाठा ६८ टक्क्यांवर पोहचला व रविवारी (दि.१५) गोदावरीच्या पातळीतही वाढ झाल्याचे चित्र होते. रविवारी पहाटेपर्यंत ...

ठळक मुद्देगोदावरीच्या पातळीत वाढ पहाटेपर्यंत ५२ मिमी पाऊससरींच्या वर्षावाने नाशिककर चिंब

नाशिक : मागील दीड महिन्यांपासून नाशिककरांना पावसाच्या समाधानकारक वर्षावाची प्रतीक्षा होती. गेल्या बुधवारी पावसाचे जोरदार ‘कमबॅक’ झाल्यानंतर पुन्हा गती मंदावली होती. शुक्रवारपर्यंत रिपरिप सुरूच होती; मात्र शनिवारी संध्याकाळपासून पावसाचा जोर शहरासह जिल्ह्यात वाढल्याने गंगापूर धरणाचा जलसाठा ६८ टक्क्यांवर पोहचला व रविवारी (दि.१५) गोदावरीच्या पातळीतही वाढ झाल्याचे चित्र होते. रविवारी पहाटेपर्यंत शहरात जोरदार पाऊस झाला. दिवसभर पावसाची संततधार कायम होती.रविवारपासून पावसाला दमदार सुरुवात झाली.शहरास जिल्ह्यात पावसाचे प्रमाण वाढले होते. शनिवारी संध्याकाळपर्यंत शहरात केवळ दोन मिमी इतका पाऊस पडला; मात्र रात्री साडेआठ वाजेपर्यंत पावसाचे प्रमाण १४ मिमीवर पोहचले होते. मध्यरात्रीनंतर पुन्हा पावसाने जोर धरला. रविवारी पहाटेपर्यंत शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू होता. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संध्याकाळी ४० मिलीमिटर इतका पाऊस नोंदविला गेला. दमदार हजेरीचा दिवस पावसाने रविवार निवडल्यामुळे चाकरमान्यांसह विद्यार्थीवर्गाचे हाल झाले नाही. सकाळपासून शहरातील रस्ते ओस पडलेले होते. पावसामुळे नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळल्याने बाजारपेठांमध्येही शुकशुकाट होता. दुपारी ३ वाजेपासून पावसाने संध्याकाळी ५ वाजेपर्यंत अल्पशी विश्रांती घेतली. संततधार उघडल्याने नागरिक काही प्रमाणात रस्त्यावर आले. सकाळपर्यंत शहरात ५२ मिमी व जिल्ह्यात सरासरी पावसाचे प्रमाण ३१.३२ मिमी इतके होते. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचे प्रमाण कायम राहिल्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली होती. सकाळी ६२ टक्क्यांवर असलेला धरणसाठा दिवसभरात अधिक वाढला. जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद इगतपुरी तालुक्यात झाली. देवळा, नांदगाव, बागलाण, मालेगाव या तालुक्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.गोदावरीच्या पातळीत वाढ झाल्याने पंचवटी अग्निशामक केंद्राकडून गोदाकाठालगतच्या विक्रेत्यांना व नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या. देवमामलेदार मंदिराचे पटांगण पाण्याखाली गेले होते. नाशिककरांचे पारंपरिक पर्जन्यमापक असलेल्या दुतोंड्या हनुमानाच्या मूर्तीच्या पायाला पाणी लागले होते. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा वरुणराजाची कृपादृष्टी उशिराने झाल्यामुळे गोदामाईचे खळाळलेले रूप नाशिककरांना विलंबाने पहावयास मिळाले.आठ तासांत१८ मिमी पाऊसशहर व परिसरात पहाटेपासून संततधार सुरू असल्याने सकाळी ८.३० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत शहरात १८.२ मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद हवामान केंद्राकडून करण्यात आली आहे.४दिवसभर चाललेल्या संततधारेने नाशिकर ओलेचिंब झाले. गोदामाईदेखील या हंगामात पहिल्यांदा खळाळताना नाशिकरांनी पाहिली.४मागील वर्षीच्या १५ जुलैच्या तुलनेत रविवारी समाधानकारक पाऊस शहरासह जिल्ह्यात झाला.

टॅग्स :Rainपाऊस