शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

संत सावता, नामदेव महाराज स्मृतिसोहळा

By admin | Updated: July 28, 2014 00:56 IST

सिन्नर : शहर व परिसरात संतश्रेष्ठ सातवा महाराज व संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा स्मृतिसोहळा उत्साहात

सिन्नर : शहर व परिसरात संतश्रेष्ठ सातवा महाराज व संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा स्मृतिसोहळा उत्साहात पार पडला. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथील महामित्र परिवाराच्या वतीने शिवाजी चौकात स्मृती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. संतश्रेष्ठ सावता महाराज यांनी आपल्या अभंगातून कर्म सिद्धांत मांडला आहे. ‘कांदा, मुळा भाजी अवघी विठाई माझी, मिरची लसून कोथिंबीर अवघा जाहला हरी’ दैववादात गुंतून पडण्यापेक्षा कर्मवाद श्रेष्ठ असल्याचे त्यांनी यातून सांगितले आहे. शेताता कर्म करतानाच देवाचे नामस्मरण करा, मात्र काम सोडून रिकाम वेळ खर्च करु नका, अशी त्यांची शिकवण होती. सावता महाराज यांचे जन्मगाव आरण पंढरपूरपासून अवघ्या २० किलोमीटर ँंअंतरावर असतानाही ते कधीही पंढरीच्या वारीला गेले नाही. राज्यभरातून येणाऱ्या दिंड्या त्यांच्या मळ्यात विसवण्याची परंपरा आजही टिकून आहे, अशी माहिती दत्ता वायचेळे यांनी यावेळी दिली. सावता महाराजांच्या प्रतिमेस बाजीराव माळी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. संत गोरोबा काका भजनी मंडळाने सादर केलेल्या विविध भजनांची सर्वांचे लेक्ष वेधून घेतले. ह. भ. प. विश्वनाथ महाराज क्षीरसागर, रवींद्र महाराज यांनी विविध अभंग सादर केले. किशोर जाधव यांनी प्रास्ताविक केले. मनोज माळी यांनी सूत्रसंचालन केले, तर अनंत खांबेकर यांनी आभार मानले. याप्रसंगी महामित्र परिवाराने तयार केलेल्या सावता महाराज चित्रदर्शिकेचे मोफत वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास मनमोहन गुजराथी, अशोक भागवत, राजेंद्र देशमुख, तुकामरा गिते, अनिल वाघ, ज्ञानेश्वर भालेराव, रवींद्र भास्कर, सोमनाथ लोहारकर, जगन जाधव, नामदेव कुटे, गोपीनाथ वाजे, नितीन हांडोरे, विनायक मिठे, अशोक कांडेकर, मधुकर वाजे, बहिरू शिंदे, राजेंद्र जाधव आदिंसह नागरिक उपस्थित होते. येथील विजयनगर भागातील संत सावता महाराज मंदिरात पुण्यतिथीनिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे ५ ला अभिषेक, आठ वाजता सत्यनाराणय पूजन व दहा वाजता भजनी मंडळाच्या भजन गायनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर दुपारी एकपासून महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील सेवाभावी संस्थांचे सदस्य, महिला मंडळ सहभागी झाले होते. (वार्ताहर)