शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

रु सलेला वरुणराजा परतला

By admin | Updated: July 3, 2016 23:58 IST

महिन्यानंतर हजेरी : पेरणीयोग्य पावसाची अजूनही शेतकऱ्यांना प्रतीक्षा, पाणीटंचाई कायम

 येवला : पावसाळा सुरू झाल्यानंतर महिन्यापासून येवला शहर व परिसरासह दहा किलोमीटर परिघात दडी मारलेल्या पावसाने रविवारी दुपारी तासभर हजेरी लावली. पावसाचे आगमन झाल्याने अनेकांच्या चेहऱ्यावरची कळी खुलली. पाणीटंचाईच्या भीषण संकटाने ग्रासलेल्या पालिका प्रशासनाने अद्यापही सुटकेचा नि:श्वास सोडलेला नाही. धरण क्षेत्रात चांगला पाऊस होऊ दे आणि पाणी संकट दूर होऊ दे, अशीच प्रार्थना आजही कायम आहे. पाऊस लांबल्यामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य तीव्र पाणीटंचाईच्या भीतीने येवला शहरवासीय चिंतेत होते. हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वी रविवारपर्यंत पाऊस दाखल होण्याचा अंदाज वर्तवला होता. अखेर ४ आठवड्यांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने रविवारी तासभर हजेरी लावली. अद्यापही पेरणीयोग्य पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.यंदा जूनच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस असल्याचा हवामान खात्याचा अंदाज खोटा ठरला. पावसाळ्याच्या सुरुवातीपासून पावसाने दडी मारल्याने खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. अशा स्थितीत शेतकऱ्यांंचे डोळे आभाळाकडे लागलेले असताना रविवारी पाऊस पडता झाला. आता पावसाने रोज यावे, अशीच अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. ओला दुष्काळ परवडला पण पाऊस हवाच, अशी भावनादेखील शेतकरी व्यक्त करीत आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ हवामान असले तरी पावसाने शहरासह तालुक्याला हुलावणी दिल्याचे चित्र होते. ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट नाही, वादळवारा नाही अशातच रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरणामुळे जोरदार पाऊस येण्याची शक्यता वाटत होती. दुपारी साडेअकराच्या सुमारास शहरासह तालुक्यात पावसाचे आगमन झाले. गेल्या तीन वर्षांपासून येवला तालुक्यात पावसाचे प्रमाण कमीच राहिले आहे. यंदा पाणीटंचाईचा सामना करताना तालुकावासीय व प्रशासन मेटाकुटीला आले आहेत. त्यात जून संपला तरी पावसाचा पत्ता नसल्याने शेतकरी व प्रशासन हवालदिल झाले होते. पाऊस सुरू झाला म्हणून आता सर्वांच्याच चेहऱ्यावरची कळी खुलली आहे.