शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

‘गायत्री मार्केटिंग’च्या विरोधात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 00:47 IST

लकी ड्रॉच्या नावे कोट्यवधी रुपये जमा करून गाशा गुंडाळलेल्या ‘गायत्री मार्केटिंग’ कंपनीच्या असंख्य गुंतवणूकदारांनी सोमवारी सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन आयोजकांविरुद्ध तक्रार दाखल केली असून, पोलिसांंनी गुंतवणूकदारांचे जाबजबाब लिहून घेण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी फरार आयोजकाशी संपर्क साधला असता, त्याने लवकरच गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचे आश्वासन दिले आहे.

ठळक मुद्दे लकी ड्रॉच्या नावे कोट्यवधी रुपये जमा पोलीस आयुक्तांना फसवणूक झाल्याचे निवेदनमारहाण करण्याच्या धमक्या 

नाशिक : लकी ड्रॉच्या नावे कोट्यवधी रुपये जमा करून गाशा गुंडाळलेल्या ‘गायत्री मार्केटिंग’ कंपनीच्या असंख्य गुंतवणूकदारांनी सोमवारी सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन आयोजकांविरुद्ध तक्रार दाखल केली असून, पोलिसांंनी गुंतवणूकदारांचे जाबजबाब लिहून घेण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी फरार आयोजकाशी संपर्क साधला असता, त्याने लवकरच गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचे आश्वासन दिले आहे.  दरमहा साडेचारशे ते सातशे रुपये गोळा करून महिन्यातून एकदा लकी ड्रॉद्वारे सभासदांना दुचाकी वाहन देणाºया या योजनेत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सुमारे दहा हजार नागरिकांनी भाग घेतला होता. गेल्या वर्षी सुरू झालेल्या या योजनेच्या पंधरा महिन्यांनंतर जमा होणाºया साडेनऊ हजार रुपयांच्या मोबदल्यात ‘गायत्री मार्केटिंग’ कंपनी प्रत्येक सभासदाला एलएडी दूरदर्शन संच देणार होता.  ही योजना जून महिन्यात संपुष्टात येण्यापूर्वीच आयोजकांनी ठक्कर बजार बसस्थानकानजीक उघडलेले कंपनीचे कार्यालय बंद करून पोबारा केला त्यामुळे हवालदिल झालेल्या शेकडो गुंतवणूकदारांनी आयोजकांचा शोध घेण्यास सुरुवात केली. परंतु, आज देतो, उद्या देतो, असे आश्वासन देणाºया आयोजकांनी अखेर सभासदांचे फोन उचलणेही बंद केले.  या संदर्भात ‘लोकमत’मध्ये प्रकाश झोत टाकणारी वृत्तमाला प्रसिद्ध झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी एकत्र येत पोलीस आयुक्तांना फसवणूक झाल्याचे निवेदन दिले होते.  आयुक्तांनी याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश सरकारवाडा पोलिसांना दिल्याने सोमवारी असंख्य गुंतवणूकदारांनी सकाळपासूनच सरकारवाडा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या दिला व ‘गायत्री मार्केटिंग’च्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मारहाण करण्याच्या धमक्या पोलिसांनी गायत्री मार्केटिंगच्या भरत पाटील या आयोजकांशी संपर्क साधला असता, त्याने आपण बाहेरगावी असल्याचे सांगितले. दूरदर्शन संच देणाºया कंपनीने आमची फसवणूक केल्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला असून, लवकरच गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचे आश्वासन दिले. परंतु गुंतवणूकदारांनी गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरल्यामुळे पोलिसांनी त्यांचे जाबजबाब नोंदवून घेतले आहेत. दरम्यान, काही गुंतवणूकदारांनी आयोजकांशी संपर्क साधला असता, त्यांना मारहाण करण्याच्या धमक्या देण्यात आल्याची तक्रार काही गुंतवणूकदारांनी केली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत आयोजकांनी गुंतवणूकदारांचे पैसे परत न केल्यास गुन्हा दाखल करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयPolice Stationपोलीस ठाणे