शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
2
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
3
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
5
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
7
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
8
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
9
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
10
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
11
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
12
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
13
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
14
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
15
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
16
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
17
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
18
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
19
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
20
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

आरटीईची सोमवारी चौथी सोडत ; नाशकात 1431 जागा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2019 7:25 PM

शैक्षणिक वर्ष २०१९-२० सुरू होऊन तीन महिने उलटूनही आरटीई प्रवेशप्रक्रियेचा घोळ सुरूच असून, गेल्या महिनाभरापासून सुस्थावलेल्या आरटीई प्रवेशप्रक्रियेला पुन्हा मुहूर्त मिळाला आले. अंतर्गत आर्थिक दुर्बल व मागासवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राखीव २५ टक्के जागांवरील प्रवेशप्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर शिक्षण विभागाला जाग आली असून आरटीईची रखडलेली चौथी सोडत सोमवारी (दि.९)जाहीर करण्यात येणार आहे. 

ठळक मुद्देआरीटीई प्रवेशासाठी सोमवारी जाहीर होणार लॉटरी प्रतिक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना दिलासा संधी मिळणाऱ्या विदयार्थ्यांचे 11 ते 21 सप्टेंबरदरम्यान प्रवेश

नाशिक : शैक्षणिक वर्ष २०१९-२० सुरू होऊन तीन महिने उलटूनही आरटीई प्रवेशप्रक्रियेचा घोळ सुरूच असून, गेल्या महिनाभरापासून सुस्थावलेल्या आरटीई प्रवेशप्रक्रियेला पुन्हा मुहूर्त मिळाला आले. अंतर्गत आर्थिक दुर्बल व मागासवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राखीव २५ टक्के जागांवरील प्रवेशप्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर शिक्षण विभागाला जाग आली असून आरटीईची रखडलेली चौथी सोडत सोमवारी (दि.९)जाहीर करण्यात येणार आहे. आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवर दरवर्षी जुलैच्या अखेपर्यंत शेवटची लॉटरी निघून प्रवेशप्रक्रिया जवळपास पूर्ण होते. परंतु, यावर्षी आॅगस्ट महिना  उलटूनही केवळ तीनच फेºया झाल्या असून उपलब्ध ५ हजार ७३५ जागांपैकी १ हजार ४३१ जागा रिक्त असताना चौथ्या फेरीसंदर्भात कोणतीही सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे उर्वरित जागांवर प्रतीक्षेतील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार की नाही याविषयी पालकांमध्ये संभ्रम निर्माण  झाला होता. तब्बल तीन महिने प्रक्रिया चालल्यानंतरही १४३१ जागा रिक्त राहून विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नसतील तर वंचित घटकांना शिक्षणाचा हक्क मिळणार कसा? असा सवाल ‘लोकमत’ उपस्थित केल्यानंतर सुस्थावलेल्या शिक्षण विभागाने चौथी फेरी घेण्याची घोषणा शिक्षण संचालक द. गो. जगताप यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यातून जाहीर केली आहे. त्यानुसार सोमवारी चौथी सोडत काढली जाणार असून त्यानंतर प्रवेशाची संधी मिळणाºया विद्यार्थ्यांच्या पालकांना ११ ते ३१ सप्टेंबर या कालावधीत प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.

इन्फो-आत्तापर्यंत ४ हजार ३०४  प्रवेश जिल्ह्यातील ४५७ शाळांमध्ये ५ हजार ७३५ जागांसाठी १४ हजार ५६० अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी केवळ ४ हजार ३०४ विद्यार्थ्यांचे प्रवेश होऊ शकले असून उर्वरित अजूनही १० हजार २५६ विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत, तर तब्बल १ हजार ४३१ जागा रिक्त आहेत. अनेक पालक या प्रक्रियेवरच अवलंबून आहेत. अशा पालकांना त्यांच्या पाल्याच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली होती. परंतु, शिक्षण विभागाने चौथ्या फेरीची घोषणा केल्याने प्रतीक्षेत असलेल्या पालकांना दिलासा मिळाला आहे.  

टॅग्स :Educationशिक्षणNashikनाशिकRight To Educationशिक्षण हक्क कायदाStudentविद्यार्थीSchoolशाळा