समीर भुजबळ यांच्या अटकेच्या निषेधार्थ नाशकात रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:38 IST2020-12-04T04:38:52+5:302020-12-04T04:38:52+5:30

सुमारे अर्धातास सुरू असलेल्या या आंदोलनामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी पोलिसांनी सर्व आंदोलनकर्त्यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा ...

Roadblocks in Nashik to protest Sameer Bhujbal's arrest | समीर भुजबळ यांच्या अटकेच्या निषेधार्थ नाशकात रास्ता रोको

समीर भुजबळ यांच्या अटकेच्या निषेधार्थ नाशकात रास्ता रोको

सुमारे अर्धातास सुरू असलेल्या या आंदोलनामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी पोलिसांनी सर्व आंदोलनकर्त्यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.

ओबीसी आरक्षण बचावासंदर्भात विविध मागण्यांसाठी पुणे शहरात शनिवार वाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, ऐनवेळी पोलिसांनी परवानगी नाकारल्याने समीर भुजबळ यांच्यासह आंंदोलकांनी वाडा परिसरातील रस्त्यावर ठाण मांडत ठिय्या मांडत आंदोलन केले. आंदोलनादरम्यान समीर भुजबळ यांच्यासह ओबीसी आंदोलकांना पोलिसांनी अटक केली. त्यामुळे नाशिकमध्ये या अटकेचा निषेध करण्यात आला.

आंदोलनात अंबादास खैरे, मकरंद सोमवंशी, मुख्तार शेख, मुकेश शेवाळे, अमर वझरे, रवींद्र शिंदे, अमोल आव्हाड, जय कोतवाल, मुकेश शेवाळे, योगेश देसले, हर्षल चौधरी, पुष्पा राठोड, सुजाता कोल्हे यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

छायाचित्र ०३ एनसीपी...पुणे येथे ओबीसींच्या आरक्षणाच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्याचा प्रयत्न केल्याबद्दल माजी खासदार समीर भुजबळ यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करताना कार्यकर्ते.

Web Title: Roadblocks in Nashik to protest Sameer Bhujbal's arrest