शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता सुरक्षितता : वडाळा-डीजीपीनगर रस्त्यावर पांढरे पट्टे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 16:17 IST

रविशंकर मार्गाच्या टी-पॉइंटवरील वाहतूक बेटापासून पुढे डीजीपीनगर, विघ्नहरण गणेश मंदिरापर्यंतचे पथदीप बंद असल्यामुळे मागील अनेक महिन्यांपासून रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य कायम आहे

ठळक मुद्देवाहतूक बेटामध्ये नव्याने पथदीप बसविण्याची मागणी डीजीपीनगर, विघ्नहरण गणेश मंदिरापर्यंतचे पथदीप बंद

नाशिक : वाहतुकीसाठी असुरक्षित बनत चाललेल्या वडाळा-डीजीपीनगरमार्गे पुणे-मुंबई महामार्गांना जोडणाऱ्या संत सावता माळी कॅनॉल रस्त्यावर ठिकठिकाणी पांढरे पट्टे मारण्यात आले आहेत. तसेच काही ठिकाणी अजूनही पांढºया पट्ट्यांची प्रतीक्षा आहे.वडाळा-डीजीपीनगर रस्ता हा वर्दळीचा आहे. या रस्त्यावर नेहमीच अपघात घडतात.

रस्त्याला ठिकठिकाणी धोकादायक अपघाती वळणं आहेत. यामुळे या वळणांवरून मार्गस्थ होताना वाहने समोरासमोर येऊन अपघात घडतो. या रस्त्याला उपनगरांमधील जोड रस्तेदेखील येऊन मिळतात. त्यामुळेही या रस्त्यावरील वाहतूक असुरक्षित होते. वडाळा चौफुली, रहेमतनगर येथे पांढरे पट्टे मारण्यात आले आहेत. मात्र येथून पुढे खोडेनगर, पांडुरंग चौक, म्हसोबा चौक, गणेशनगर जोड रस्ता या ठिकाणी पांढरे पट्टे मारण्याची गरज आहे. तसेच रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूंनी पांढरा पट्टा मारला जावा, अशी मागणी होत आहे. तसेच दुभाजकाजवळ व रस्त्याच्या कडेला धोकादायक वळणांवर रिफ्लेक्टर बसविण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.

या रस्त्यावरील रविशंकर मार्गाच्या टी-पॉइंटवरील वाहतूक बेटापासून पुढे डीजीपीनगर, विघ्नहरण गणेश मंदिरापर्यंतचे पथदीप बंद असल्यामुळे मागील अनेक महिन्यांपासून रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य कायम आहे. या मार्गावरील बंद पथदीप त्वरित दुरुस्त करण्याची मागणी होत आहे. तसेच नव्या वाहतूक बेटामध्ये नव्याने पथदीप बसविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या रस्त्याच्या सुरक्षिततेबाबत महापालिका, शहर वाहतूक नियंत्रण शाखेने संयुक्तरीत्या प्रयत्न करणे गरजेचे आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाroad transportरस्ते वाहतूक