शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील उघड्या रोहित्रांचा धोका

By admin | Updated: July 16, 2017 00:04 IST

नाशिक : शहरासह उपनगरांमध्ये अनेक कॉलनी आणि नववसाहतींच्या भागात ठिकठिकाणी उघड्या रोहित्रांमुळे धोका निर्माण झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहरासह उपनगरांमध्ये अनेक कॉलनी आणि नववसाहतींच्या भागात ठिकठिकाणी उघड्या रोहित्रांमुळे धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात उघड्या रोहित्रांतील तारांमधून जमिनीत वीजप्रवाह उतरून विजेचा धक्का लागून प्राणहानी होण्याचे प्रकार घडत आहेत. सिडको परिसरातील पवननगर भागात गेल्या बुधवारी उघड्या वीजतारांचा धक्का लागून एक गाय मृत्युमुखी पडली. तसेच एका महिलेला विजेचा शॉक लागला. गेल्या महिनाभरात अनेक ठिकाणी उघड्या वीजतारा, उघड्या पडलेल्या भूमिगत वीजतारा, उघडे रोहित्र यांच्यानजीक शॉक लागल्याचे जीवघेणे प्रकार घडले. वीज वितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे यासंबंधी वारंवार तक्रार करूनही उघड्या रोहित्रांना झाकणे बसविण्यात आलेले नाहीत. विशेषत: सिडको परिसरांत अनेक चौकांच्या कोपऱ्यात उघडी रोहित्रे असून, काही ठिकाणी तर उद्यानांच्या मध्येच रोहित्र बसविण्यात आलेले आहे. या रोहित्रांची झाकणे भुरट्या चोरट्यांनी लंपास केल्याने अनेक महिन्यांपासून ही रोहित्रे उघडीच आहे. त्यातून वीजप्रवाह वाहत असल्याने याठिकाणी उद्यानात खेळणाऱ्या मुलांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. तसेच रोहित्रांच्या खाली उगवलेले गवत खाण्यासाठी गायी वासरे येतात. तसेच या ठिकाणी टाकलेले शिळे अन्न खाण्यासाठी कुत्रे फिरतात. या मुक्या जनावरांनादेखील शॉक लागून मृत्यू होऊ शकतो, असे मृत्युमुखी पडण्याचे प्रकार पावसाळ्यात घडत आहेत. कारण याठिकाणी पाण्यामुळे जमिनीत वीज प्रवाह उतरतो. इंदिरानगर, सातपूर, पंचवटीसह अंबड, कामटवाडे, डीजीपीनगर आदि भागांत अनेक ठिकाणी असलेल्या उघड्या रोहित्रांना तातडीने झाकणे बसविण्याची मागणी या भागातील रहिवाशांनी केली आहे.या ठिकाणी आहेत धोकादायक रोहित्रे इंदिरानगर परिसरातील पुष्प उद्यानासमोरील परिसर. कमोदनगर भागातील मोकळ््या जागेत.सिडको परिसरातील तोरणानगरजवळील मोती चौक भागात. आयटीआय पुलाजवळील शाहूनगर येथे.जेलरोड, कॅनॉलरोड, पंचगंगा सोसायटीजवळ. नाशिकरोड दत्तमंदिरजवळील ऋतुरंग भवनाजवळ. देवळालीगावातील सावतामाळी हॉटेल परिसर.