शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

दंगलीत जात-धर्म नव्हे तर माणूस मरतो : वाटपाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 01:23 IST

स्वराज्याची निर्मिती छत्रपती शिवरायांनी सगळ्या जाती-धर्मांना सोबत घेऊन केली त्यामुळे स्वराज्यावर कोणा एकाचा अधिकार नाही. जाती-धर्मावरून दंगली पेटविणे हे स्वराज्यात कधीही घडले नाही; मात्र दुर्दैवाने आज आपल्यासमोर घडत आहे. दंगलींमध्ये कोणताही धर्म किंवा जात मरत नाही तर केवळ माणूस मरतो, हे आपण कधी लक्षात घेणार आहोत? असा सवाल प्रा. सोपान वाटपाडे यांनी वसंत व्याख्यानमालेच्या व्यासपीठावरून उपस्थित केला.

नाशिक : स्वराज्याची निर्मिती छत्रपती शिवरायांनी सगळ्या जाती-धर्मांना सोबत घेऊन केली त्यामुळे स्वराज्यावर कोणा एकाचा अधिकार नाही. जाती-धर्मावरून दंगली पेटविणे हे स्वराज्यात कधीही घडले नाही; मात्र दुर्दैवाने आज आपल्यासमोर घडत आहे. दंगलींमध्ये कोणताही धर्म किंवा जात मरत नाही तर केवळ माणूस मरतो, हे आपण कधी लक्षात घेणार आहोत? असा सवाल प्रा. सोपान वाटपाडे यांनी वसंत व्याख्यानमालेच्या व्यासपीठावरून उपस्थित केला.  यशवंतराव महाराज देवमामलेदार पटांगणावर सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेचे सोमवारी (दि.१४) वाटपाडे यांनी चौदावे पुष्प गुंफले. ‘शिवचरित्र- आधुनिक समस्यांवर शिवचरित्रातून उपाय’ या विषयावर वाटपाडे यांनी उपस्थितांना छत्रपती शिवरायांचा राज्यकारभार व संभाजी राजे भोसले यांचा त्याग व समर्पण याविषयी प्रबोधन केले. यावेळी ते म्हणाले, छत्रपतींनी सगळ्या जाती-धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्य उभारले हे विसरून चालणार नाही. आज शिवचरित्र व शिवजयंती मनोरंजन आणि धिंगाण्यापलीकडे जात नाही, हे दुर्दैवाने सांगावे लागत असल्याची खंतही वाटपाडे यांनी बोलताना व्यक्त केली....तर जिजाऊ जन्माला यायला हव्याशिवबा जन्माला यावे, असे प्रत्येकाला वाटते. मात्र त्यासाठी आई जिजाऊ जन्माला यायला हव्या; मात्र आजची सुशिक्षित पिढी विज्ञान व तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेत गर्भलिंगनिदान चाचण्यांच्या माध्यमातून गर्भातच स्त्रीभ्रूण हत्येचे पाप करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या समाजात जर जिजाऊ जन्माला आल्या नाही तर शिवबा जन्माला कसा येईल? असा प्रश्न वाटपाडे यांनी बोलताना उपस्थित केला. आजचे व्याख्यान  विषय : माध्यमांचे स्वातंत्र्य व लोकशाहीचा जिवंतपणा ,  व्याख्याता : अ‍ॅड. असीम सरोदे

टॅग्स :Nashikनाशिक