शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिकाला लुटणाऱ्या रिक्षाचालकाला अटक

By admin | Updated: August 24, 2016 23:59 IST

भद्रकाली गुन्हे शोध पथकाने रचला सापळा

नाशिक : आठवडाभरापूर्वी शालिमारच्या एका लुटारू रिक्षाचालकाने आपल्या मित्राच्या मदतीने ज्येष्ठ नागरिकाला रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास रिक्षातून नेऊन धमकावत २० हजाराचा माल लुटला होता. याप्रकरणी संशयिताला राहाता तालुक्यातून भद्रकाली गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले आहे.शालिमार रिक्षा थांब्यावरून एका ६६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला उत्तमनगरला जाण्यासाठी प्रमोद अनंत देशमुख ( रा. उत्तमनगर) हे रिक्षात (एम.एच.१५ एके ५२३९) बसले होते. दरम्यान, रिक्षाचालक अनिल छबू जाधव (२०, हेडगेवार चौक, सिडको) याने त्याच्या एका अल्पवयीन मित्राच्या मदतीने देशमुख यांना दीड तास शहरात फिरविले. देशमुख यांच्या हातात सोन्याची अंगठी, मनगटी घड्याळ, रोख रक्कम, महागडा मोबाइल पाहून या दोघांनी त्यांना लुटण्याचा इरादा केला. कृषिनगर परिसरात रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास नेऊन दोघांनी मिळून देशमुख यांना धमकावले. आठवडाभरापासून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी शहरातील रिक्षा थांब्यावर लुटारूच्या संशयास्पद रिक्षाचा शोध घेत होते. रिक्षाचा क्रमांकही देशमुख यांनी बघितलेला नसल्याने तपासात अडचण निर्माण झाली होती; मात्र त्यांनी सांगितलेल्या रिक्षेच्या वर्णनावरून पोलीस रिक्षाचा शोध घेत होते. पोलिसांना संशयित जाधव हा कोळपेवाडी (ता. राहाता) येथे लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली तांबे यांनी विशेष पथक जाधवच्या मागावर पाठविले. पथकप्रमुख पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वारे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसमवेत संशयित रिक्षाचालक जाधव यास रिक्षासह ताब्यात घेतले. त्याच्याकडून सोन्याची अंगठी, मोबाइल, एटीएम कार्ड हस्तगत करण्यात आला आहे. रिक्षाचा मालक, अल्पवयीन साथीदार आदिबाबत संशयिताकडे चौकशी सुरू असून अधिक तपास वारे करीत आहेत. (प्रतिनिधी)