शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यात भाताची लागवड

By admin | Updated: July 16, 2017 01:10 IST

टाकेद खुर्द येथील रणरागिणींनी आक्रमक होत येथील गुडघाभर चिखल असणाऱ्या गावातील रस्त्यावरच भाताची लागवड करून आपला संताप व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कबेलगाव कुऱ्हे : वर्षानुवर्षे गावात रस्ते नसल्याने दरवर्षी पावसाळ्यात सर्व गाव चिखलमय होते. यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गटारींचे सांडपाणी गावभर पसरून साथीचे रोग वाढले आहेत. टाकेद खुर्द येथील रणरागिणींनी आक्रमक होत येथील गुडघाभर चिखल असणाऱ्या गावातील रस्त्यावरच भाताची लागवड करून आपला संताप व्यक्त केला. लोकप्रतिनिधींच्या नावाने निषेध करून टाकेद खुर्द गावात किमान मूलभूत सुविधा मिळणार आहेत का नाही, असा आर्त सवाल या महिलांनी उपस्थित केला आहे. दरवर्षी पावसाळ्यात चिखलात वाहणाऱ्या गटारीच्या पाण्यातून ग्रामस्थांना मार्गक्रमण करावे लागते. अस्वच्छतेमुळे गावकऱ्यांचे आरोग्य बिघडून साथीच्या रोगांशी सामना करावा लागत आहे. यास गावातील लोकप्रतिनिधींसह तालुक्यातील लोकप्रतिनिधींचे वाढते दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दरवर्षी हीच समस्या असल्याने गावातील महिलांनी आक्र मक भूमिका घेऊन गावातील रस्त्यावर भात लागवड (आवणी) करत संताप व्यक्त केला.  सध्या पावसाळ्याचे दिवस असून, या गावात पक्का रस्ता नाही. जुन्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून, ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वारंवार निवेदने देऊनही काही उपयोग होत नाही. शासन व लोकप्रतिनिध मुद्दाम मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करून महिलांनी रस्त्यात भात लावणी करून आपला संताप व्यक्त केला. या आंदोलनात गीता लगड, जनाबाई लगड, बहिरू लगड, मनोज जोशी, नामदेव लगड सहभागी झाले होते.