शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

नद्यांना पुनर्जीवित करा: राजेंद्र सिंह

By admin | Updated: July 1, 2015 01:41 IST

नद्यांना पुनर्जीवित करा: राजेंद्र सिंह

नाशिक : साडेचारशे वर्षांपूर्वी सिंंहस्थ कुंभमेळ्याला मोठी प्रतिष्ठा होती; मात्र ती लुप्त झाल्याने सध्या कुंभमेळा हा केवळ साधूंच्या लढाईचे ठिकाण बनला आहे. पूर्वीच्या कुंभमेळ्यात नीर, नदी व नारी अशा भारतीय संस्कृतीतील तीन महत्त्वांच्या घटकांचा आदर केला जात असे. सिंहस्थाला तीच पूर्वप्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी नद्यांना पुनर्जीवित करा, असे आवाहन प्रख्यात जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी नाशिककरांना केले. नंदिनी पुनर्भरण समितीच्या वतीने खिमजी भगवानदास आरोग्यभवनात आयोजित ‘नीर, नदी, नारी’ सन्मान कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमानंतर डॉ. राजेंद्र सिंह यांच्या हस्ते रामकुंडावर गोदामातेची आरती करून नाशिक परिसरातील अरुणा, नीलगंगा, नंदिनी, वाघाडी, वालदेवी, कपिला व अहिल्या या सात नद्यांचे कमंडलूत आणलेले पाणी गोदावरीला अर्पण करण्यात आले. तत्पूर्वी, कार्यक्रमात राज्याच्या जलसंवर्धन विभागाचे सचिव प्रभाकर देशमुख, त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्त ललिता शिंदे, भाजपा नेते गोपाळ पाटील, अंजली पाटील, अ‍ॅड. मुग्धा सपटणेकर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी डॉ. सिंह म्हणाले, भारत हा सांस्कृतिकदृष्ट्या प्रचंड वैविध्यपूर्ण देश असल्याने वैचारिक मंथनासाठी पूर्वी कुंभमेळ्याच्या निमित्ताने लोक दर बारा वर्षांनी एकत्र येत, समाजातील वाईट चाली काढून टाकून चांगले नियम तयार करीत. कुंभमेळ्यातूनच पुढील १२ वर्षांची दिशा ठरवली जात असे. स्नानावरून लढाईचा नव्हे, तर शांतीचा संदेश दिला जाई. अगदी अकबर, हुमायूनसारखे मुस्लीम बादशहाही कुंभमेळ्यास उपस्थित राहत. नंतरच्या काळात इंग्रजांनी कुंभमेळा हा फक्त हिंदूंचा धार्मिक उत्सव असल्याचे सांगत त्यात ठरवलेले नियम समाजाला बंधनकारक नसल्याचे सांगितले. तेव्हापासून कुंभमेळ्याची दुर्दशा होत गेली. कुंभमेळ्याला पूर्वप्रतिष्ठा देण्याची यंदा चांगली संधी असून, त्यासाठी नीर, नदी व नारीचा सन्मान करायला हवा. देशातील प्रत्येक नदीचे रक्षण करणे हे संविधानानुसार प्रत्येकाचे कर्तव्य आहे. नद्यांना पुनर्जीवित करणे हाच कुंभाचा खरा अर्थ असल्याचेही ते म्हणाले. यावेळी ललिता शिंदे, दत्ताजी ढगे, देवांग जानी यांनी मनोगत व्यक्त केले. विशाखा देसले, सोनी जयस्वाल यांनी नृत्याविष्कार सादर केला. गोपाळ पाटील यांनी प्रास्ताविक केले. राजेश भुसाने यांनी सूत्रसंचालन केले. राजेश पंडित यांनी आभार मानले.