शहरं
Join us  
Trending Stories
1
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
2
'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही
3
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
4
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
5
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
6
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
7
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
8
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
9
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
10
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
11
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
12
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
13
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
14
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
15
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
16
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
17
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
18
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
19
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
20
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

महसूल खात्याचे काम बंद आंदोलन

By admin | Updated: January 7, 2017 01:37 IST

महसूल खात्याचे काम बंद आंदोलन


नाशिक : नांदगाव तालुक्यातील नवीन शर्तीच्या जमिनींच्या प्रकरणात प्रांत अधिकाऱ्यासह महसूल खात्यातील अकरा अधिकाऱ्यांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने नोंदविलेल्या गुन्ह्यामुळे महसूल खात्यात तीव्र संतापाची लाट उसळून त्याचे परिणाम शुक्रवारी शासकीय कामकाजावर झाला. जिल्ह्यातील समस्त महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन करून विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत, या साऱ्या प्रकरणाचा चुकीचा अर्थ काढून फिर्याद दाखल करणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्याविरुद्धच कारवाई करण्याची एकमुखी मागणी केली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने गुरुवारी सायंकाळी नांदगाव पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन प्रांत अधिकारी वासंती माळी, तहसीलदार सुदाम महाजन, पुनम दंडिले यांच्यासह २३ जणांविरुद्ध शासनाचे नुकसान करणे व रकमेचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल केल्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सरळ सरळ महसूल खात्याच्या अधिकारात हस्तक्षेप केल्याचा हा प्रकार असल्याची टीका केली जात असून, त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी महाराष्ट्र राज्य महसूल अधिकारी महासंघ, राज्य नायब तहसीलदार, तहसीलदार संघटना, राज्य तलाठी संघटना, राज्य चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना, राज्य कोतवाल संघटना अशा सर्वांनी एकत्र येत लेखणी बंद आंदोलन पुकारले त्यामुळे दिवसभर महसूल खात्याचे कामकाज ठप्प झाले. या संदर्भात शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् व विभागीय आयुक्तएकनाथ डवले यांची भेट घेऊन या साऱ्या प्रकरणातील वस्तुस्थिती मांडली, शिवाय हा सारा प्रकार महसूल खात्याच्या अर्धन्यायिक बाबीशी निगडीत असताना व त्यासंदर्भात अपर आयुक्त तसेच उच्च न्यायालयात प्रकरणे प्रलंबित असताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने संपूर्ण प्रकरणाचा विपर्यास अर्थ काढला. या प्रकरणात महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक लाभापोटी कोणतीही कृती केली नसल्याचा दावाही करण्यात आला असून, सदरची फिर्याद बिनशर्त मागे घेण्यात यावी तसेच वस्तुस्थितीचा विपर्यास करून फिर्याद दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. शासनाने या गोष्टीची दखल घ्यावी त्यासाठी न्यायिक रिट याचिकाही दाखल करण्याचे तसेच फिर्यादीविरुद्ध प्रति फिर्याददेखील दाखल केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या निवेदनावर अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे, उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, विठ्ठल सोनवणे, महेश पाटील, सुरेखा चव्हाण, प्रवीण महाजन, राहुल पाटील, प्रज्ञा बढे, सरिता नरके, दीपमाला चौरे आदिंच्या अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

शासकीय बैठकीवर बहिष्कार
महसूल अधिकाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या स्वच्छ भारत अभियान मोहिमेच्या आढावा बैठकीला फटका बसला. जिल्हाधिकाऱ्यांसह प्रांत, तहसीलदार यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकून नांदगावच्या घटनेचा निषेध नोंदविला, त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ही बैठक घ्यावी लागली. शनिवार (दि.७)पासून काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात येणार आहे.