शहरं
Join us  
Trending Stories
1
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगालमध्ये आणखी एका भाजपा उमेदवाराच्या कारवर हल्ला
3
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
4
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, फोडल्या काचा
5
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
6
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
7
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
8
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
9
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
10
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
11
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
12
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
13
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
14
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
15
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
16
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
17
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
18
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
19
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
20
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाची शहरात हजेरी

By admin | Updated: September 26, 2014 00:33 IST

आदिशक्तीवर जलाभिषेक : उत्तरा नक्षत्राचे अखेरचे चरण

नाशिक : शहर व परिसरात घरोघरी घटस्थापना होत आदिशक्तीच्या पूजापाठमध्ये नाशिककर व्यस्त असतानाच, सायंकाळी परतीच्या पावसाने हजेरी लावत आदिशक्तीवर जलाभिषेक केला. उत्तरा नक्षत्राच्या अंतिम चरणात नवरात्रीच्या पहिल्याच माळेला पावसाने हजेरी लावल्याने सायंकाळी खरेदीदार व विक्रेत्यांची एकच धांदल उडाली. जिल्ह्यात यंदाच्या मोसमात आतापर्यंत ८२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. उत्तरा नक्षत्राची सुरुवातीची तीनही चरणे कोरडी गेल्यानंतर वरुणराजाने आज सायंकाळी अचानक हजेरी लावली. त्यामुळे नवरात्रोत्सवाच्या खरेदीत गुंतलेल्या नाशिककरांची धावपळ उडाली. आज सकाळपासूनच आकाशात ढगांनी गर्दी केली होती. याशिवाय सप्टेंबरमध्येच आॅक्टोबर हिटचाही तडाखा नाशिककरांचा घाम काढत होता. त्यामुळे पावसाची शक्यता होतीच. सायंकाळी अचानक अंधारून आल्यानंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. घटस्थापनेला पहिल्याच माळेला नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या कालिकादेवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. पावसामुळे भाविकांचीही तारांबळ उडाली. शहर व परिसरात आतापर्यंत पावसाने समाधानकारक हजेरी लावली असून, शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ९३ टक्के भरलेले आहे, तर काश्यपी ८२ टक्के, गौतमी गोदावरी ९७ टक्के, तर दारणा धरण ९९ टक्के भरले आहे. जिल्ह्यातही आतापर्यंत ८२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी सप्टेंबरअखेर १०४ टक्के पाऊस नोंदविला गेला होता. (प्रतिनिधी)